ब्रेकिंग : रामराजे नाईक निंबाळकर यांचा शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 20:45 IST2019-09-12T20:45:04+5:302019-09-12T20:45:27+5:30
रामराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय अखेर निश्चित केला आहे.

ब्रेकिंग : रामराजे नाईक निंबाळकर यांचा शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय
सातारा - रामराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय अखेर निश्चित केला आहे. फलटण येथील निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला. रामराजे, संजीवराजे, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जि प माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, सदस्य दत्ता अनपट, बाळासाहेब सोळस्कर, मंगेश धुमाळ यांच्या सह फलटण मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत रामराजे निर्णय जाहीर करणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू होत्या. अखेरीस आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. रामराजे नाईक निंबाळकरांच्या पक्षांतरामुळे अनेक दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडल्याने आधीच गलितगात्र झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला अजून एक धक्का बसणार आहे.