दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 12:13 IST2021-12-13T12:12:32+5:302021-12-13T12:13:06+5:30

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना तत्काळ रुग्णालयात हलविले. मात्र, अतिरक्तस्त्रावाने या दोघांचाही मृत्यू झाला.

Both died in a two wheeler accident in Aundh satara district | दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू

दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू

औंध : खटाव तालुक्यातील चौकीचा आंबा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला. काल, रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. याबाबत रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली नव्हती.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोकराळे येथील सुट्टीवर आलेला रेल्वे जवान केदार श्रीरंग सावंत औंधकडून चौकीचा आंबा येथे निघाले होते. तर उंबर्डे येथील अधिकराव पवार हे चौकीचा आंबा येथील आपले दुकान बंद करून औंधकडे निघाले होते. दरम्यान चौकीचा आंबा याठिकाणी या दोघांच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना तत्काळ रुग्णालयात हलविले. मात्र, अतिरक्तस्त्रावाने या दोघांचाही मृत्यू झाला. याबाबत रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद झाली नव्हती.

Web Title: Both died in a two wheeler accident in Aundh satara district