Satara: संगम माहुली नदीत बुडालेल्या मुंबईतील डान्सरचा मृतदेह सापडला, दोन दिवस सुरु होती शोधमोहिम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 15:49 IST2025-04-25T15:47:26+5:302025-04-25T15:49:05+5:30
सातारा : चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर संगम माहुली नदीत बुडालेल्या डान्सरचा मृतदेह दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. २४) तब्बल ४१ तासांनंतर ...

Satara: संगम माहुली नदीत बुडालेल्या मुंबईतील डान्सरचा मृतदेह सापडला, दोन दिवस सुरु होती शोधमोहिम
सातारा : चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर संगम माहुली नदीत बुडालेल्या डान्सरचा मृतदेह दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. २४) तब्बल ४१ तासांनंतर शोधपथकाच्या हाती लागला. ही घटना दि. २२ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली होती.
साैरभ शर्मा (वय २८, रा. घाटकोपर, मुंबई, मूळ रा. राजस्थान), असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. संगम माहुली येथे गेल्या काही दिवसांपासून ‘राजा शिवछत्रपती’ चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. या शूटिंगसाठी अभिनेता संजय दत्त व रितेश देशमुख हे साताऱ्यात आले होते. मंगळवारी (दि. २२) दिवसभर संगम माहुली नदीकाठी शूटिंग सुरू होते. सायंकाळी ५ वाजता शूटिंग बंद करण्यात आले.
त्यानंतर चित्रपटात काम करणारे सात कलाकार अंघोळीसाठी नदीत उतरले. त्यामध्ये डान्सर साैरभ शर्मासुद्धा त्यांच्यासमवेत अंघोळीसाठी गेला. पोहत असताना अचानक साैरभ नदीतील भोवऱ्यामध्ये बुडाला. दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर गुरुवारी सकाळी सौरभचा मृतदेह नदीपात्रात आढळला.