शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशात पुन्हा ब्लॉगरची हत्या

By admin | Updated: August 7, 2015 22:09 IST

बांगलादेशातील धर्मनिरपेक्ष ब्लॉगर नीलोय नील चौधरी याची त्याच्या घरीच भोसकून हत्या करण्यात आली असून, देशातील ही चौथी ब्लॉगर हत्या

संजीव वरे -वाई तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला थोड्याफार फरकाने समान ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवता आले आहे. तालुक्यातील महत्त्वाच्या बावधन ग्रामपंचायतीमध्ये शशिकांत पिसाळ यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने पुन्हा वर्चस्व राखले आहे. तर पश्चिम भागात काँग्रेसचे बापूसाहेब शिंदे व विकास शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने चिखली ग्रामपंचायतीत सत्ता मिळविली आहे.बहुतेक गावात स्थानिक गट व तेथील प्रश्नावर निवडणूक झाली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना कमी-जास्त फरकाने ग्रामपंचायती मिळविता आल्या आहेत. तालुक्यातील तीन गावांत सत्तांतर झाले आहे. मागील निवडणुकीत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. परंतु, गेल्या काही वर्षांत साखर कारखाना, जिल्हा बँक, बाजार समिती, सोसायटी अशा अनेक निवडणुका होऊन गेल्या. त्यातच ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही जाहीर झाल्या. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील व किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी गावपातळीवरच्या निवडणुकीत विशेष लक्ष घातले नव्हते. काही गावांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात लढती झाल्या. तर अनेक गावांत राष्ट्रवादीच्या दोन गटांत लढत झाली. पसरणी, उडतरे या गावांत काँग्रेस-राष्ट्रवादीची युती पाहावयास मिळाली. त्यांना विरोधकांनी आघाडी करून लढत दिली.बावधनमध्ये सूतगिरणीचे अध्यक्ष शशिकांत पिसाळ व किसन वीर कारखान्याचे संचालक, काँग्रेसचे सयाजी पिसाळ यांच्या गटात निवडणूक झाली. १४ जागा राष्ट्रवादीने दोन काँग्रेसने व एक अपक्ष असे निवडून आले. पश्चिम भागात चिखली येथे काँग्रेसचे बापूसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने नऊ जागा जिंकून राष्ट्रवादीचा दारुण पराभव केला. गुळुंब येथे चुरशीची लढत झाली. काँग्रेस सहा व राष्ट्रवादीने पाच जागांवर विजय मिळविला. अभेपुरी येथे जयवंत मांढरे यांच्या पॅनेलने बाजी मारली आहे. अनेक ठिकाणी पॅनेल एका पक्षाचे तर सरपंचपदाचे उमेदवार दुसऱ्या पक्षाचे निवडून आले आहेत. सरपंच निवडीच्या वेळी बिनविरोध व अपक्ष निवडून आलेले सदस्य काय भूमिका घेतात? हे महत्त्वाचे ठरणार आहे. स्थानिक पातळीवरच निवडणूक...वाई तालुक्यातील निवडणुकीत एकूणच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी विशेषकरून निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवर गटा-तटाचे राजकारण झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला समान संधी मिळाली आहे.