पोटात दुखत असल्याने ब्लेडने स्वत:वर वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 13:49 IST2019-05-17T13:47:51+5:302019-05-17T13:49:05+5:30

पोटात जास्त दुखत असल्याच्या त्रासाला कंटाळून एकाने स्वत:च्या पोटावर ब्लेडने वार केल्याची खळबळजनक घटना बुध, ता. खटाव येथे घडली. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Blade himself blows himself as he stomach acne | पोटात दुखत असल्याने ब्लेडने स्वत:वर वार

पोटात दुखत असल्याने ब्लेडने स्वत:वर वार

ठळक मुद्देपोटात दुखत असल्याने ब्लेडने स्वत:वर वारकंपनीमध्ये दीड लाखांची चोरी

सातारा : पोटात जास्त दुखत असल्याच्या त्रासाला कंटाळून एकाने स्वत:च्या पोटावर ब्लेडने वार केल्याची खळबळजनक घटना बुध, ता. खटाव येथे घडली. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सतीश दिगंबर ठोंबरे (वय ५३, रा. बुध, ता. खटाव) असे स्वत:च्या पोटावर ब्लेड मारून घेतलेल्यांचे नाव आहे. याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सतीश ठोंबरे यांच्या पोटात वारंवार दुखत होते. बुधवारीही रात्रीही त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी या त्रासाला कंटाळून स्वत:च्या पोटावर ब्लेडने वार केले. अशा अवस्थेत ते झोपी गेले.

सकाळी त्यांच्या अंथरूणावर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे घरातल्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे घरातील लोक घाबरून गेले. त्यांनी तत्काळ ठोंबरे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

कंपनीमध्ये दीड लाखांची चोरी

सातारा  येथील औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयांचे ब्रास बुश चोरून नेले. ही घटना बुधवारी रात्री घडली. संबंधित कंपनीमधील अ‍ॅडमीन विशाल गायकवाड (वय ३३, रा. विकासनगर, सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याने कंपनीत प्रवेश करून एकूण सहा लाकडी बॉक्स ब्रास बुश चोरट्यांनी लंपास केले. शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Web Title: Blade himself blows himself as he stomach acne