शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वाई-खंडाळा-महाबळेश्वरात भाजपचे मनसुबे धुळीस!, मकरंद पाटील यांची पॉवर गेम यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 18:29 IST

वाईतही आबांचा करिश्मा...

सचिन काकडेसातारा : राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार)ने आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी (अजित पवार)ने भाजपच्या आक्रमक रणनीतीला चोख प्रत्युत्तर देत तीनही तालुक्यांत भाजपचे मनसुबे धुळीस मिळवले.या निवडणुकीत मतदारसंघातील एकूण ९ गट आणि १८ गणांपैकी ६ गट व ११ गणांवर राष्ट्रवादी (अजित पवार)ने कब्जा मिळवला, तर सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला केवळ २ गट आणि ५ गणांवर समाधान मानावे लागले.महाबळेश्वरात भाजपचा भोपळा..महाबळेश्वर तालुक्यात भाजपने पक्षप्रवेशांचा धडाका लावत मोठी तयारी केली होती, मात्र निकाल पाहता भाजप येथे पूर्णपणे फेल ठरली. भिलार गटात मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी (अजित पवार)ने गट आणि भिलार व मेटगुताड या दोन्ही गणांवर वर्चस्व राखले. तळदेव गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेनेने भाजपला धक्का देत विजय मिळवला. भाजपची सर्व रणनीती येथे सपशेल अपयशी ठरली असून, त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.

खंडाळ्यात राष्ट्रवादी (अजित पवार)ची किमयाखंडाळ्यात मंत्री जयकुमार गोरे यांनी विशेष लक्ष घातल्याने भाजप मुसंडी मारणार असे चित्र होते; पण मकरंद पाटील यांच्या चक्रव्यूहात भाजप अडकली. राष्ट्रवादी (अजित पवार)ने स्थापनेनंतर प्रथमच पंचायत समितीच्या ६ पैकी ४ जागा जिंकत भाजपला बॅकफूटवर धाडले. तर ३ पैकी फक्त १ गट भाजपला राखता आला. या निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा मकरंद पाटील यांच्याच नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले.वाईतही आबांचा करिश्मा...वाई तालुक्यात मकरंद पाटील यांचा गड फोडण्यासाठी भाजपने सर्वशक्तीनिशी प्रयत्न केले होते. मंत्री जयकुमार गोरे स्वत: या रणांगणात उतरल्याने येथील निवडणूक रंगतदार होणार असे चित्र होते. परंतु ४ पैकी ३ गट राष्ट्रवादी (अजित पवार)ने खिशात घातले, तर ८ पैकी ५ गणांत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. मोठ्या घोषणा आणि रणनीती करूनही भाजपला येथे केवळ १ गट आणि ३ गणांवर समाधान मानावे लागले.

मतदारसंघातील निकालाचे पक्षनिहाय चित्रपक्ष - गट - गणएकूण जागा - ०९ - १८

  • राष्ट्रवादी (अजित पवार) - ०६ - ११
  • भाजप - ०२ - ०५
  • शिंदेसेना - ०१ - ०२

राष्ट्रवादी (अजित पवार)च्या विजयाची कारणे१. मतदारसंघात मकरंद पाटील यांचा जनसंपर्क आणि विकासकामे२. प्रत्येक गणात आणि गटात कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे३. कामांच्या माध्यमातून जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यात यश

भाजपच्या पिछाडीची कारणे१. केवळ पक्षप्रवेशावर भर दिला, मात्र बूथ पातळीवर मते वळवण्यात अपयश२. नवीन कार्यकर्त्यांना संधी तर निष्ठावंतांची झालेली नाराजी३. मकरंद पाटील यांच्या विरोधात केलेली आक्रमक टीका मतदारांना रुचली नाही

English
हिंदी सारांश
Web Title : NCP's Makrand Patil Thwarts BJP's Plans in Wai-Khandala-Mahabaleshwar Elections

Web Summary : In Wai-Khandala-Mahabaleshwar, NCP (Ajit Pawar) dominated local elections, countering BJP's efforts. Makrand Patil's strategy secured victories across three talukas. BJP faced setbacks, failing to win Mahabaleshwar and underperforming in Khandala and Wai. Patil's strong network and public trust proved decisive.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६Satara areaसातारा परिसरpanchayat samitiपंचायत समितीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारMakarand Patilमकरंद पाटीलBJPभाजपा