शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Satara ZP: सातारा जिल्हा परिषदेत भाजप, राष्ट्रवादीची गटनोंदणी पूर्ण; अध्यक्ष निवडीच्या तारखेची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 15:58 IST

शिंदेसेनेच्या गटनेतेपदी अशोक दगडू पाटील यांची यापूर्वीच निवड झाली आहे

सातारा : जिल्हा परिषदेत प्रमुख पक्ष राष्ट्रवादी (अजित पवार) आणि भाजपच्या सदस्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात गट नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली. शिंदेसेनेने गुरुवारी (दि. १२) ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता ग्रामविकास व पंचायत राज खात्याकडून जिल्हा परिषद निवडीचा कार्यक्रम जाहीर होऊन जिल्हाधिकारी प्रत्यक्ष निवडीची तारीख कधी जाहीर करणार, याकडे सर्व सदस्यांचे लक्ष लागले आहे.जिल्हा परिषदेत सध्याची पक्षीय बलाबल भाजपचे २७, राष्ट्रवादी (अजित पवार) चे २० तर शिंदेसेनेचे १५ सदस्य आहेत. सत्ता स्थापनेसाठी शिंदेसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची किंवा भाजपने यापैकी एका पक्षाला सोबत घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पहिला दावा कोणता पक्ष करणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.गेल्या काही दिवसांपासून गटनोंदणीची प्रक्रिया सुरू होती. शिंदेसेनेने चार दिवसांपूर्वी गटनोंदणी केली आहे. त्यानंतर सोमवारी राष्ट्रवादी (अजित पवार)चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांच्या उपस्थितीत अनिल देसाई, ॲड. उदयसिंह पाटील, उदय कबुले यांच्यासह सर्व वीस सदस्यांनी आवश्यक पूर्तता करून गटनोंदणी केली. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादी (शरद पवार)चे पदाधिकारीही उपस्थित होते. त्यानंतर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या उपस्थितीत राजू भोसले, प्रिया शिंदे, सोनल गोरे आदींसह सर्व २७ सदस्यांनी गट नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली.जिल्हाधिकारी निवडीची अधिकृत तारीख जाहीर होईपर्यंत सत्तास्थापनेची गणिते मांडली जाणार आहेत. त्यामुळे हालचालींना आणखी वेग येणार आहे.

गटनेतेनदी कबुले, राजू भोसलेगटनोंदणीनंतर पक्षांच्या गटनेत्यांच्याही निवडी जाहीर करण्यात करण्यात आल्या. त्यानुसार राष्ट्रवादी (अजित पवार)च्या गटनेतेपदी उदय कबुले यांची तर भाजपच्या गटनेतेपदी राजू भोसले यांची निवड करण्यात आली आहे. शिंदेसेनेच्या गटनेतेपदी अशोक दगडू पाटील यांची यापूर्वीच निवड झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Zilla Parishad: BJP, NCP Group Registration Complete, Awaiting Election Date

Web Summary : BJP and NCP completed group registration in Satara Zilla Parishad. All eyes are now on the election date announcement. Political circles are keen to see which party stakes the first claim to power, given the current party strength.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६Satara areaसातारा परिसरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५zpजिल्हा परिषद