शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

भाजप स्वार्थासाठी घटना पायदळी तुडवण्याचे काम करीत आहे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचे टीकास्त्र

By प्रमोद सुकरे | Updated: December 2, 2025 17:21 IST

लोकांचा ईव्हीएम मशीनवर विश्वास राहिला नाही

कराड: राज्यात नगरपालिका निवडणुकांसाठी आज, मंगळवारी मतदान सुरु आहे. दरम्यानच, उद्या होणारी मतमोजणी २१ डिसेंबरला करण्याचा न्यायालयाने निर्णय दिला. ही सगळी परिस्थिती पाहता हा निवडणूक आयोगाचा व सरकारचा गोंधळ आहे. त्यामुळे हा भारताचा नव्हे तर मोदींचा निवडणूक आयोग असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 'लोकमत'शी बोलताना केली.चव्हाण म्हणाले, खरंतर नगरपालिकेच्या निवडणुका ९/१० वर्षांनंतर होत आहेत. ७३/७४ वी घटनादुरुस्ती झाली. त्यानुसार दर ५ वर्षांनी स्थानिक स्वराज्य निवडणूका घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. पण राजकीय स्वार्थापोटी भाजपने घटना पायदळी तुडवत या निवडणुका पुढे पुढे ढकलण्याचे काम केले. अनेक वर्ष येथे प्रशासक लादले. लोकांचे अधिकार संपुष्टात आणण्याचा हा त्यांचा डाव आहे.आता सरकार तर ही निवडणूक आयोगाची चूक आहे. त्यामुळे काही निवडणुका पुढे ढकलल्या, तर मतमोजणी पुढे गेल्याचे सांगत आहे. पण सरकारी वकील न्यायालयात बाजू मांडताना कमी पडले हे ते सांगत नाहीत. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम हे भाजपचे सरकार करीत आहे.असेही चव्हाण म्हणाले.लोकांचा ईव्हीएम वर विश्वास नाही!मुळातच लोकांचा ईव्हीएम मशीनवर विश्वास राहिलेला नाही. निवडणूक प्रक्रियेमध्ये लोकांचा विश्वास उडत चालला आहे. अशात आता मतदानानंतर मतमोजणी १७/१८ दिवस पुढे ढकलल्याने त्या गोडाऊन मध्ये राहणार आहेत. आता तेथे त्या मशिनशी काही छेडछाड होईल का हे माहित नाही असा प्रश्न उपस्थित केला. जनता जागृत होणे गरजेचे लोकशाही टिकवण्यासाठी जनता जागृत होणे गरजेचे आहे. जोपर्यत जनता जागृत होत नाही तोपर्यंत काही उपयोग नाही. नाहीतर इथे हलक्या पावलांनी हुकूमशाही कधी येईल हे कळणार नाही असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP trampling constitution for self-interest, alleges Congress leader Prithviraj Chavan.

Web Summary : Prithviraj Chavan criticized BJP for delaying local elections for political gain, undermining democracy. He questioned the Election Commission's impartiality and EVM security, urging public awareness to safeguard democracy from authoritarianism.