राष्ट्रीय काँगे्रसच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाला बाळसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:05 AM2019-03-13T00:05:38+5:302019-03-13T00:06:29+5:30

कºहाड दक्षिण विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. इथं राष्ट्रवादीची अन् सेनेची ताकद तोकडी वाटते. मात्र, भाजपने चांगलेच बाळसे धरलंय ! शिवाय बंडखोर विलासराव

The Bharatiya Janata Party (BJP) in the Citadel of the National Congress | राष्ट्रीय काँगे्रसच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाला बाळसे

राष्ट्रीय काँगे्रसच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाला बाळसे

Next

प्रमोद सुकरे ।
कºहाड : कºहाड दक्षिण विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. इथं राष्ट्रवादीची अन् सेनेची ताकद तोकडी वाटते. मात्र, भाजपने चांगलेच बाळसे धरलंय ! शिवाय बंडखोर विलासराव पाटील-उंडाळकरांचा एक गट सक्रिय आहेच. या साऱ्या रसमिसळीत मतदार राजा लोकसभेला नेमका काय निर्णय घेईल? हे सांगता येत नाही.

सध्यातरी राष्ट्रवादीने उदयनराजे भोसले यांनाच पुन्हा उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे दोन्ही काँगे्रस ‘आघाडी’ धर्माचा ‘राग’ आळवतील, अशी आशा आहे. परंतु विरोधी सेना-भाजप युतीचा उमेदवार अद्याप निश्चित नाही. त्यामुळे हातात ‘धनुष्यबाण’ घ्यायचा की ‘कमळ’ याबाबत विरोधकांच्यात संभ्रम आहे. जोपर्यंत विरोधी उमेदवारावर शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत नेमकी राजकीय परिस्थिती सांगणे जरा कठीणच !
बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पंजाबराव पाटील हे लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर झाले आहे. पंजाबराव हे कºहाड दक्षिणेतील टाळगावचे; पण त्यांचा प्रभाव दक्षिणच्या मतदारांवर किती पडणार? हे आत्ताच सांगता येत नाही. त्यातच भाजपकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे तर सेनेकडून पुरुषोत्तम जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे; पण विरोधी उमेदवार कोण असेल? याबाबत मतदारांच्यात सध्या तरी संभ्रम निर्माण झाला आहे.

वीरस्मरण कार्यक्रम प्रभावी...
विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांचा कºहाडशी खूप कमी संपर्क राहिला, असे लोक सांगतात. मात्र, छत्रपतींचे वंशज म्हणून त्यांच्यावर प्रेम करणारीही तेवढीच माणसं आहेत. पुलवामा येथे नुकताच भारतीय सैन्य दलावर दहशतवादी हल्ला झाला. त्यामुळे उदयनराजेंनी आपला वाढदिवस रद्द केला; पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘वीरस्मरण’ हा एक शहिदांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम कºहाडात घेतला. त्यामुळे राजेंप्रती असणारी सहानुभूती वाढायला मदतच झाली, असे त्यांचे समर्थक सांगतात.

उमेदवार वर्ष मतदारसंघ मिळालेली मते
उदयनराजे भोसले २००९ कºहाड दक्षिण ७०,३२४
पुरुषोत्तम जाधव २००९ कºहाड दक्षिण ४३, ४१०
उदयनराजे भोसले २०१४ कºहाड दक्षिण ६१, ६४८
पुरुषोत्तम जाधव २०१४ कºहाड दक्षिण ५२,५८४

Web Title: The Bharatiya Janata Party (BJP) in the Citadel of the National Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.