आनंदराव पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:57 IST2021-02-23T04:57:39+5:302021-02-23T04:57:39+5:30

सकाळी निवासस्थानी कुटुंबीयांनी आनंदराव पाटील यांना औक्षण केले. त्यानंतर त्यांनी विजयनगर येथे ग्रामदैवताचे दर्शन घेतले. ...

Best wishes to Anandrao Patil | आनंदराव पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

आनंदराव पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

सकाळी निवासस्थानी कुटुंबीयांनी आनंदराव पाटील यांना औक्षण केले. त्यानंतर त्यांनी विजयनगर येथे ग्रामदैवताचे दर्शन घेतले. त्यांनी दिवंगत प्रेमलाकाकी चव्हाण व आनंदराव चव्हाण यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर कऱ्हाड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी त्यांनी अभिवादन केले. दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासही अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत सहकारी उपस्थित होते.

राज्यातील व पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी दूरध्वनीवरून व प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार हुस्नबानू खलिपे, सत्यजित देशमुख, माजी आमदार मदन भोसले, सुभाष चव्हाण, आमदार दीपक चव्हाण, अनिल देसाई, किशोर बाचल, प्रल्हाद साळुंखे, कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, तहसीलदार अमरदीप वाकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, नगरसेवक राजेंद्र यादव, विजय यादव, किरण पाटील, विजय वाटेगावकर, कराड अर्बन बॅंकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, प्रकाश गवळी, आर. टी. स्वामी, मोहनराव जाधव, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, वसंतराव शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य विजय चव्हाण, नंदकुमार डूबल, हंबीरराव भोसले,

विजयराव कदम, आप्पासाहेब गायकवाड, फिरोज कागदी,

चंद्रकांत पवार, माजी सभापती राजेश पवार, सुरेश पाटील, प्रशांत सुकरे, जयवंत मोहिते, शिवाजी माळी, शशिकांत माळी यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आनंदराव पाटील यांना शुभेच्छा दिल्या. (वा प्र.)

फोटो ओळ : माजी आमदार आनंदराव पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कृष्णा बॅंकेचे अध्यक्ष डाॅ. अतुल भोसले, यावेळी दयानंद पाटील, सुनील पाटील आदी उपस्थित होते.

फोटो :22pramod 02

Web Title: Best wishes to Anandrao Patil