नगरसेवकासोबत फिरतो म्हणून युवकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:26 IST2021-06-19T04:26:10+5:302021-06-19T04:26:10+5:30

याबाबत सुशांत देवानंद जगताप (वय २१, रा. विठ्ठलनगर मार्केट यार्ड, शनिवार पेठ, कऱ्हाड) याने शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. ...

Beating the youth as he walks with the corporator | नगरसेवकासोबत फिरतो म्हणून युवकाला मारहाण

नगरसेवकासोबत फिरतो म्हणून युवकाला मारहाण

याबाबत सुशांत देवानंद जगताप (वय २१, रा. विठ्ठलनगर मार्केट यार्ड, शनिवार पेठ, कऱ्हाड) याने शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून महेश पाटील, ऋतुराज मोरे, विक्रम शिंगण (सर्व रा. कऱ्हाड) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मार्केट यार्डमध्ये राहणारा सुशांत जगताप हा नगरसेवक इंद्रजित गुजर यांच्यासोबत फिरत असतो. त्याचा राग मनात धरून चिडून जाऊन तिघांनी आपसात संगनमत करून बुधवारी रात्रीच्या सुमारास बनवडीतील आहेर कॉलेजसमोर सुशांतला गाडीतून खाली ओढून शिवीगाळ करीत हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर इंद्रजित गुजर यांना घराबाहेर काढण्यासाठी सुशांतला घेऊन त्यांच्या घराकडे गेले. त्यावेळी विक्रम शिंगण याने सुशांतच्या डोक्यात प्लास्टिकची खुर्ची घालून त्याला जखमी केले. याबाबत सुशांत जगताप याने शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस नाईक कोळी तपास करीत आहेत.

Web Title: Beating the youth as he walks with the corporator