विरोधात साक्ष न देण्यासाठी एकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 14:47 IST2020-03-12T14:46:25+5:302020-03-12T14:47:05+5:30

न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात विरोधी व्यक्तीच्या बाजूने साक्ष न देण्यासाठी एकाला दांडक्याने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली घडली.

Beating one for not testifying | विरोधात साक्ष न देण्यासाठी एकाला मारहाण

विरोधात साक्ष न देण्यासाठी एकाला मारहाण

ठळक मुद्देविरोधात साक्ष न देण्यासाठी एकाला मारहाणतिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सातारा : न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात विरोधी व्यक्तीच्या बाजूने साक्ष न देण्यासाठी एकाला दांडक्याने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली घडली.

याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.निखील चंद्रास जाधव, संग्राम किसनराव जाधव, चंद्रास किसनराव जाधव (सर्व रा. जिहे, ता.सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील संशयित यांच्याविरोधात जिहे येथील एकाने पोलीस ठाण्यात दिलेल्या फियार्दीवरून सध्या न्यायालयात खटला सुरू आहे. त्या खटल्यात सुनिल राजाराम निकम (रा, जिहे, ता.सातारा सध्या रा.ऐरोली मुंबई) हे साक्षीदार असून, त्यांनी संशयितांच्याविरोधात न्यायालयात साक्ष न देण्यासाठी त्यांना मारहाण करण्यात आली आहे.

तसेच निकम हे मुंबईत राहत असलेल्या ठिकाणी जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे. हवालदार सावंत हे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Beating one for not testifying