धुलवड कशी साजरी करायची, यावरून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 02:47 PM2020-03-12T14:47:51+5:302020-03-12T14:49:24+5:30

सातारा येथील लक्ष्मी टेकडी परिसरातील एका युवकाला धुलवड कशी साजरी करायची यावरून झालेल्या वादातून मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चौघाजणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सौरभ वाघमारे, ओम कांबळे, जय कांबळे, सागर शिंदे (सर्व रा. सदर बझार, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

Beat on how to celebrate the dust | धुलवड कशी साजरी करायची, यावरून मारहाण

धुलवड कशी साजरी करायची, यावरून मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्देधुलवड कशी साजरी करायची, यावरून मारहाणचौघाजणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सातारा : येथील लक्ष्मी टेकडी परिसरातील एका युवकाला धुलवड कशी साजरी करायची यावरून झालेल्या वादातून मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चौघाजणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सौरभ वाघमारे, ओम कांबळे, जय कांबळे, सागर शिंदे (सर्व रा. सदर बझार, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, १० रोजी दुपारी लक्ष्मी टेकडी परिसरात हे सर्व युवक एका ठिकाणी बसले होते. त्यावेळी धुलवड हा सण कसा साजरा करायचा याची चर्चा त्यांच्यात सुरू होती. त्यावेळी झालेल्या वादाच्या कारणातून संशयितांनी अनिल मोहन कांबळे (रा. लक्ष्मी टेकडी,सदरबझार, सातारा) यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी सौरभ याने त्याच्या हातातील बिअरची बाटली कांबळे यांच्या डोक्यात फोडून त्यांना जखमी केल्याचे फियार्दीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार मच्छिंद्र जाधव हे करत आहेत.

Web Title: Beat on how to celebrate the dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.