शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रीपदाचे बॅनर राजकीय संभ्रमावस्थेसाठीच - राजेश क्षीरसागर

By नितीन काळेल | Updated: May 2, 2023 18:57 IST

बॅनर लावून मुख्यमंत्री होता येत नाही

सातारा : ‘आमच्याकडे खरेपणा आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील निकाल आमच्यासारखा लागून सरकारही पाच वर्षे पूर्ण करेल. कारण, बॅनर लावून मुख्यमंत्री होता येत नाही. राजकीय संभ्रमावस्थेसाठीच ते लावण्यात आले असल्याचे सांगत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीची खिल्ली उडवली.सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत क्षीरसागर बोलत होते. यावेळी शिवसेनेचे (शिंदे गट) पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शासकीय योजनांची जत्रा व शिवदूत नेमणुकीसाठी क्षीरसागर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध प्रश्नांना उत्तरेही दिली.राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘ शासकीय योजनांपासून लाभार्थी वंचित राहता कामा नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शासकीय योजनांची जत्रा लाभार्थ्यांच्या दारापर्यंत पोहोचवावी. त्याचबरोबर या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटनेतील पदाधिकाऱ्यांबरोबरच नव्याने नेमणुका करण्यात येणाऱ्या शिवदुतांचे सहाय्य घेण्यात येईल.संघटन वाढीवर भर राज्यात सत्तांतर होऊन १० महिने होऊन गेले आहेत. या सरकारने लोकहिताचे अनेक निर्णय घेतले. तरीही विरोधकांनी चिखलफेक केली. आमचं काम चांगलं सुरू असून आता त्यांच्याकडे टिका करण्यासारखे काहीच नाही. आता पक्षाचं संघटन वाढीसाठी गाव तेथे शाखा आणि शिवसैनिक यावर भर देण्यात येणार आहे, असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.पहिल्या निवडणुकीत यश मिळतेच असे नाहीराज्यात शिंदे गटाला किती बाजार समितीत यश मिळाले, पत्रकारांच्या या प्रश्नावर क्षीरसागर यांनी आम्ही आढावा घेत आहोत. अजून आम्ही नवीन आहोत. पहिल्या निवडणुकीत यश मिळतेच असे नाही. आगामी निवडणुकांसाठी चांगली बांधणी करत आहोत, असे सांगितले. तर कास, बामणोली, महाबळेश्वरमधील बांधकामविषयावरील प्रश्नावर त्यांनी याबाबत मला काही माहिती नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाईल, असे स्पष्टीकरण दिले.पवार नवीन नेतृत्वाला वाव देत असतील...पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचे वक्तव्य केल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर राजेश क्षीरसागर यांनी शरद पवार हे नवीन नेतृत्वाला वाव देत असतील, असा चिमटा काढला. तर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या बॅनरवरील प्रश्नावरही त्यांनी राजकीय संभ्रमासाठी प्रकार झाला असावा, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्री