Crime News: अंगावर डिझेल ओतून सुनेला पेटवून देण्याचा प्रयत्न, पतीसह सासू-सासऱ्यावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 15:44 IST2022-08-05T15:43:50+5:302022-08-05T15:44:42+5:30
पत्नीवर संशय घेत मारहाण करुन पेटवण्याचा प्रयत्न

Crime News: अंगावर डिझेल ओतून सुनेला पेटवून देण्याचा प्रयत्न, पतीसह सासू-सासऱ्यावर गुन्हा दाखल
पाचगणी : सुनेच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला म्हणून खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली सासू, सासरे, पती यांच्या विरोधात पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना भिलार येथे बुधवारी, (दि. ३) घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी जलील बशीर डांगे, मोहसीन जलील डांगे, सायरा जलील डांगे (सर्व रा. भिलार, ता. महाबळेश्वर) घरातील महिलेवर अंगावर डिझेल टाकून पेटवून देणे जिवे मारण्याचा खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी सून आसमा मोहसीन डांगे (वय २७) यांनी सासू, सासरा व पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची माहिती अशी की, सून आसमा डांगे बसली असताना सासरे जलाल हे दारू पिऊन आले. तसेच ते शिवीगाळ करू लागले. त्याच वेळेस आसमा यांच्यावर संशय घेत पती मोहसीन बशीर डांगे यांनी ‘तू सतत बाहेर जातेस’ म्हणत मारहाण करून बाटलीमध्ये आणलेले डिझेल सासू सायरा, सासरे जलाल यांनी मिळून अंगावर ओतून मला पेटवून दिले. तसेच जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे, अशी फिर्याद फिर्यादी आसमा मोहसीन डांगे हिने तिघांच्या विरोधात दिली आहे. याप्रकरणी पाचगणी पोलीस तपास करत आहेत.