पाचगणी : जावळी (ता. मेढा) : वालूथ गावातील ग्रामपंचायत कार्यालयात सुरू असलेल्या मासिक बैठकीदरम्यान वाद विकोपाला जाऊन एका सदस्यावर शिवीगाळ, दमदाटी व मारहाणीचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना बुधवारी (दि. १८) घडली आहे. याप्रकरणी संबंधित सदस्याने मेढा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, उपसरपंचासह ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.तक्रारदार रवींद्र सर्जेराव भिलारे (वय ४५, सध्या नवी मुंबई) येथे वास्तव्यास असून, वालूथ ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. ते मसाला उद्योग व्यवसाय करतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मार्च रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास वालूथ ग्रामपंचायत कार्यालयात मासिक बैठक सुरू असताना काही सदस्यांच्या नातेवाइकांनी बैठकीत हस्तक्षेप केला. यावेळी सोमनाथ बळवंत पवार व अमरदीप अंकुश तरडे यांनी भिलारे यांच्यावर ग्रामपंचायतीच्या व सोसायटीच्या कामात घोटाळा केल्याचा आरोप करत शिवीगाळ व दमदाटी केली.वाद वाढताच संबंधितांनी भिलारे यांच्या अंगावर धाव घेऊन मारहाणीचा प्रयत्न केला. सोमनाथ पवार यांनी हातातील पाण्याची बाटली त्यांच्या अंगावर फेकल्याचेही तक्रारीत नमूद आहे, तसेच उपसरपंच समाधान जगन्नाथ पोफळे यांनी ‘बाहेर ये, तुला दाखवतो’ अशी धमकी देत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.घटनेदरम्यान भिलारे हे मोबाइलवर व्हिडीओ रेकॉर्डिंग करत असताना सुप्रिया पवार यांनी त्यांचा मोबाइल हिसकावून घेतला व तो फोडण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, विजय कांबळे यांनी हस्तक्षेप करून मोबाइल परत मिळवून दिला. यानंतर तक्रार देण्यासाठी निघालेल्या भिलारे यांना काही महिलांनी अडवून मारहाणीचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.यात आशालता शेलार, सुप्रिया पवार, आरती तरडे व वर्षा पोफळे यांचा समावेश आहे. अखेर पोलिस पाटील अभिजित भोसले व होमगार्ड यांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आली. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास मेढा पोलिस करीत आहेत.
Web Summary : During a Gram Panchayat meeting in Satara, a member was allegedly attacked. A case has been registered against the Deputy Sarpanch and seven others for assault, threats, and property damage following a dispute.
Web Summary : सतारा में ग्राम पंचायत की बैठक के दौरान एक सदस्य पर कथित तौर पर हमला किया गया। विवाद के बाद उपसरपंच और सात अन्य के खिलाफ मारपीट, धमकी और संपत्ति को नुकसान पहुंचाने का मामला दर्ज किया गया है।