Satara: सचिन-लक्ष्याची बैलजोडी ठरली ‘श्री सेवागिरी हिंदकेसरी’; शर्यत शौकिनांची रेकॉर्डब्रेक गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:24 IST2025-12-17T13:23:48+5:302025-12-17T13:24:11+5:30

सेवागिरी यात्रा : विक्रमी ११०१ गाड्या धावल्या

At the Shri Sevagiri Hindkesari bullock cart race organized as part of the festival in Pusegaon the bullock pair of Sachin Lakshya emerged victorious | Satara: सचिन-लक्ष्याची बैलजोडी ठरली ‘श्री सेवागिरी हिंदकेसरी’; शर्यत शौकिनांची रेकॉर्डब्रेक गर्दी

Satara: सचिन-लक्ष्याची बैलजोडी ठरली ‘श्री सेवागिरी हिंदकेसरी’; शर्यत शौकिनांची रेकॉर्डब्रेक गर्दी

पुसेगाव : महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील लाखो बैलगाडी शर्यत शौकिनांचे आकर्षण असलेल्या श्री सेवागिरी यात्रोत्सवानिमित आयोजित ‘श्री सेवागिरी हिंदकेसरी’ बैलगाडी शर्यतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यामध्ये शाहीदभाई मुलाणी, नातेपुते यांचा आदत किंग सचिन आणि आंबेगाव सांगलीच्या श्रीनाथ ज्वेलर्सचा लक्ष्या या बैलजोडीने पहिल्या क्रमांकाचे २ लाख ७८ रुपयांचे रोख बक्षीस जिंकून ‘श्री सेवागिरी हिंदकेसरी’चा किताब पटकावला.

येथील दहिवडी रोड बैल बाजाराजवळील मैदानात सकाळी साडेसहा वाजता मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव यांच्या उपस्थितीत मानाचा नारळ फोडून पहिला फेरा सुरू झाला.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो बैलगाडी शर्यत शौकिनांच्या उपस्थितीत शासनाच्या सर्व नियम व अटींच्या अधीन राहून पार पडलेल्या शर्यतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ही तीन राउंड बैलगाडी शर्यत होती. शर्यतीला सुमारे १२०० गाड्यांची विक्रमी नोंद होऊन गटाचे १११ फेरे व सेमीफायनलच्या १० फेऱ्या झाल्या. अंतिम फेरीत पाच गाड्या लॉबी टच झाल्याने त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

या शर्यतीत अनुक्रमे भद्रा मारुती प्रसन्न संभाजीनगर यांचा लखन आणि कै. पंढरीनाथ फडके यांचा सर्जा, जय हनुमान प्रसन्न देवीखिंडीचा बावरा आणि राहुलभाई पाटील यांचा मथुर, गोपीनाथ शेठ कर्जत गोविंदा आणि वसंत चव्हाण जालना यांचा बलमा, खानविलकर कळंबोली आणि अरविंद सामठाणे सिन्नर यांची बैलजोडी, तुषार पैलवान म्हसुर्णे यांचा शंभू आणि बाजीराव पाटील यांचा सोन्या, स्व. किशोर पाटील यांचा रामा आणि कुमठे येथील दत्तात्रय जगदाळे यांच्या बैलजोडीने यश मिळविले.

मैदानात एकापेक्षा एक वरचढ जातिवंत खिल्लार आणि म्हैसूर क्रॉस जातीच्या वेगवान बैलांच्या शर्यतीचा थरार प्रेक्षकांना अनुभवायास मिळाला. स्पर्धेतील प्रत्येक फेरा चुरशीचा होऊन स्पर्धा उत्कंठावर्धक झाली. अचूक निकाल पाहण्यासाठी ड्रोन आणि व्हिडीओ कॅमेरे तैनात करण्यात आले होते.

Web Title : सतारा: सचिन-लक्ष्य की जोड़ी बनी सेवागिरी हिंदकेसरी; दौड़ में रिकॉर्ड भीड़।

Web Summary : सतारा में श्री सेवागिरी यात्रा महोत्सव बैलगाड़ी दौड़ में सचिन-लक्ष्य की जोड़ी ने ₹2.78 लाख का पुरस्कार जीता और 'श्री सेवागिरी हिंदकेसरी' का खिताब अपने नाम किया। इस आयोजन में रिकॉर्ड तोड़ भीड़ उमड़ी और सरकारी नियमों के तहत 1200 बैलगाड़ियों ने भाग लिया।

Web Title : Satara: Sachin-Lakshya pair wins SevaGiri HindKesari; record crowd at race.

Web Summary : Sachin-Lakshya pair won the 'Shri Sevagiri HindKesari' title with a ₹2.78 lakh prize at the Shri Sevagiri Yatra festival bullock cart race. The event saw a record turnout, with 1200 bullock carts participating in the competition held under government regulations.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.