Satara ZP: सातारा झेडपीच्या सत्ता संघर्षात एकनाथ शिंदे होमपिचवर!, महायुतीतील ‘दरी’ कमी होणार?

By प्रमोद सुकरे | Updated: February 21, 2026 15:14 IST2026-02-21T15:13:24+5:302026-02-21T15:14:52+5:30

मकरंद पाटील, शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा करणार

As the struggle for power in Satara Zilla Parishad reached its peak Shinde Sena chief Deputy Chief Minister Eknath Shinde reached Dare village | Satara ZP: सातारा झेडपीच्या सत्ता संघर्षात एकनाथ शिंदे होमपिचवर!, महायुतीतील ‘दरी’ कमी होणार?

Satara ZP: सातारा झेडपीच्या सत्ता संघर्षात एकनाथ शिंदे होमपिचवर!, महायुतीतील ‘दरी’ कमी होणार?

प्रमोद सुकरे

कराड : सातारा जिल्हा परिषद सत्तेचा संघर्ष शिगेला पोहोचला असतानाच शुक्रवारी रात्री शिंदेसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होम पिचवर म्हणजेच सुरुवातीला रात्री आठ वाजता महाबळेश्वर येथे तर त्यानंतर दरे येथे पोहोचले आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा परिषद सत्ता स्थापनेबाबत शुक्रवार आणि शनिवारी दोन दिवस खलबते होण्याची शक्यता असून याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक नुकतीच झाली आहे. या निवडणुकीत भाजपने महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) यांना बाजूला ठेवत स्वबळावर निवडणूक लढवली. त्यावेळी प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. त्यामुळे महायुतीतील तणाव वाढला आहे. त्यातच भाजपला सत्ता स्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ न मिळाल्याने त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी (अजित पवार) व शिंदेसेना यांनी एकमेकांशी समन्वय साधक ही निवडणूक लढवली. त्यांनी सत्ता स्थापनेपेक्षा जास्त संख्याबळ मिळवले आहे. त्यामुळे त्या दोघांची मिळून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या असताना भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी साताऱ्यात ‘भाजपचाच अध्यक्ष होईल’ असा दावा केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

मकरंद पाटील, शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा करणार

दरम्यान साताऱ्यात महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन सत्ता स्थापन करावी यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असलेचे समजते. या पार्श्वभूमीवर होम पिचवर आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्री मकरंद पाटील, मंत्री शंभूराजे देसाई यांच्याशी आज उद्या काय चर्चा करणार? सातारची सत्ता नेमकी कोणाच्या ताब्यात येणार? याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Web Title: As the struggle for power in Satara Zilla Parishad reached its peak Shinde Sena chief Deputy Chief Minister Eknath Shinde reached Dare village