शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

हिरवा निसर्ग भोवतीने... साताऱ्यांतील सव्वाशे विद्यार्थ्यांची अजिंक्यताऱ्यावर वर्षासहल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 2:27 PM

साताऱ्यांत सलग पंधरा दिवस धो-धो पाऊस कोसळत आहे. यामुळे अजिंक्यतारा, यवतेश्वर, सज्जनगडाचे डोंगर हिरवागार झाले आहेत. भावी पिढीचे निसर्गाशी नाते जुळावेत, यासाठी साताऱ्यांतील केएसडी शानभाग विद्यालयाने वर्षासहलीचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यालयातील स्काऊट गाईडचे सुमारे सव्वाशे विद्यार्थी सहभागी झाले होते.

ठळक मुद्देसाताऱ्यांतील सव्वाशे विद्यार्थ्यांची अजिंक्यताऱ्यावर वर्षासहलनिसर्गाच्या सानिध्यात; शानभाग विद्यालयाचा अनोखा उपक्रम

सातारा : साताऱ्यांत सलग पंधरा दिवस धो-धो पाऊस कोसळत आहे. यामुळे अजिंक्यतारा, यवतेश्वर, सज्जनगडाचे डोंगर हिरवागार झाले आहेत. हिरवा निसर्ग भोवतीने असताना या निसर्गाशी भावी पिढीचे नाते जुळावेत, यासाठी साताऱ्यांतील केएसडी शानभाग विद्यालयाने वर्षासहलीचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यालयातील स्काऊट गाईडचे सुमारे सव्वाशे विद्यार्थी सहभागी झाले होते.सातारा जिल्ह्याला निसर्गाकडून भरभरून मिळाले आहे. डोंगराच्या ओघळीतून लहान-मोठे धबधबे वाहू लागले आहेत. महाबळेश्वर, पाचगणी, कासवर वर्षा सहलीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत असतात.घरातून शाळेपर्यंत विद्यार्थी रिक्षा, बस किंवा पालकांसोबत कारमधून येतात. त्यामुळे पावसात भिजण्याचा त्यांचा फारसा संबंधच येत नाही. गाड्यांच्या काचेतूनच पाऊस बघावा लागतो. घरी आले तर आई-वडील मुलांना पावसात भिजू देत नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन साताऱ्यातील केएसडी शानभाग विद्यालयाने स्काउट व गाईड उपक्रमाअंतर्गत वर्षासहलीचे आयोजन केले होते.यामध्ये पाचवीच्या तिन्ही तुकड्यांमधील सव्वाशे विद्यार्थी-विद्यार्थिनी पावसात भिजत सातारा नगरपालिकेपासून अजिंक्यतारा किल्ल्यावर चालत गेले. सहलीत सर्वांनी भरपावसात निसर्ग व प्रवासाचा आनंद आणि आस्वाद घेत पायी चालत सुमारे तीन किलोमीटरचे अंतर हसत खेळत पार केले.

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलSatara areaसातारा परिसर