पुस्तकाच्या गावात वर्षा सहल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 01:44 PM2017-08-12T13:44:48+5:302017-08-12T13:45:29+5:30

सातारा : भाऊ-बहिणींच्या नात्याचं प्रतिक म्हणजे रक्षाबंधन. प्रत्येक वर्षी वाट पाहायला लावणारा दिवस. भारतरत्न महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वाई कन्या शाळेत हा सण नेहमीच नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात येतो. पुस्तकांच महत्त्व मानवी जीवनात खूप मोलाच आहे. भिलार हे भारतातील पहिलं पुस्तकाचं गाव. त्याठिकाणी शाळेच्या ‘वर्षा’ सहलीचे आयोजन करण्यात आले.

Rainfall in the town of the book | पुस्तकाच्या गावात वर्षा सहल

भिलार भारतातील पहिलं पुस्तकाचं गाव.

Next

सातारा : भाऊ-बहिणींच्या नात्याचं प्रतिक म्हणजे रक्षाबंधन. प्रत्येक वर्षी वाट पाहायला लावणारा दिवस. भारतरत्न महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वाई कन्या शाळेत हा सण नेहमीच नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात येतो. पुस्तकांच महत्त्व मानवी जीवनात खूप मोलाच आहे. भिलार हे भारतातील पहिलं पुस्तकाचं गाव. त्याठिकाणी शाळेच्या ‘वर्षा’ सहलीचे आयोजन करण्यात आले.

‘ग्रंथ हे गुरू’ असतात. त्याप्रमाणे ते मित्र आणि बंधूही असतात. अशी कल्पना कलाशिक्षक चंद्रकांत ढाणे यांना भिलार येथे सुचली. अन् ती मुख्याध्यापिका छाया नायकवडी यांना सांगितली. त्यांनाही आयडियाची कल्पना खूप आवडली.

मग विविध वर्गातील विद्यार्थिनींनी स्वत: तयार करून आणलेल्या राख्या पुस्तके आणि ग्रंथांना बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम शाळेत साजरा करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षिका मधुमालती वेदपाठक, संस्था प्रतिनिधी स्वाती शेंडे, नमिता पाटील ग्रंथपाल किरण फरांदे हे उपस्थित होते.

शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. अभय देशपांडे, अ‍ॅड. प्रभाकर सोनपाटकी व शालेय समितीच्या सर्व सदस्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले

Web Title: Rainfall in the town of the book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.