शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
7
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
8
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
9
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
10
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
11
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
12
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
13
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
14
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
15
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
16
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
17
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
18
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
19
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
20
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

धोम वगळता मुख्य धरणांमधून विसर्ग सुरू, पावसाचा जोर कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 2:49 PM

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी धोम वगळता मुख्य धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. सध्या कोयना धरणात ८३.६६ टीएमसी पाणीसाठा झाला असून, शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्दे धोम वगळता मुख्य धरणांमधून विसर्ग सुरू, पावसाचा जोर कमी  कोयनेत ८३.६६ टीएमसी पाणीसाठा; घरांची पडझड सुरूच

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी धोम वगळता मुख्य धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. सध्या कोयना धरणात ८३.६६ टीएमसी पाणीसाठा झाला असून, शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सततच्या पावसामुळे पश्चिम भागात घरांची पडझड सुरू झाली आहे.गेल्या २० दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कोसळत आहे. या पावसाचा जोर कमी झाला असलातरी ओढे, नाले खळाळू लागले आहेत. खाचरात पाणी साठल्याने भात लागणीस मोठा वेग आला आहे. पश्चिम भागात पाऊस होत असल्याने शेतीच्या कामावरही परिणाम जाणवत असल्याचे दिसत आहे.

शनिवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर धरणात ८३.६६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणात ३२,८५३ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे साडेतीन फुटांनी उचलण्यात आले आहेत. त्यामधून १६,०६३ क्युसेक तसेच पायथा वीजगृहातून २१०० असा मिळून १८,१६३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

पाणीपातळी वाढत राहिल्यास आणखी जादा विसर्ग करण्यात येणार आहे. यावर्षी पाऊस चांगला होत असल्याने गतवर्षीपेक्षा लवकरच धरण भरणार आहे.जिल्ह्यातील इतर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कण्हेरमध्ये ८.३० टीएमसी साठा असून, ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

उरमोडी धरणही ७.८६ टीएमसी भरले असून, २,३७० क्युसेक पाण्याची आवक होऊन ४०० क्युसेक विसर्ग झाला आहे. तारळी परिसरातही पाऊस सुरू असून, धरणसाठा ५.९ टीएमसी इतका झाला आहे. धरणातून २,५८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला आहे.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलिमीटरमध्येधोम ०३ (४७३)कोयना ५५ (३१३८)बलकवडी ३८(१६९०)कण्हेर ११ (५५६)उरमोडी २९ (८१७)तारळी ३४ (१४९३)साताऱ्यात ऊन पावसाचा खेळ...सातारा शहर आणि परिसरात तीन आठवड्यांपासून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना छत्री घेऊन, रेनकोट घालून बाहेर पडावे लागत आहे. शनिवारी सकाळीही पाऊस झाला. तर काही वेळानंतर ऊन पडले होते.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसर