शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Satara: चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील संरक्षक कठड्याला धडकून रिक्षा उलटली, वृद्ध ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 19:15 IST

मुराद पटेल शिरवळ : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ (ता.खंडाळा) येथे एसटी स्टँड समोर असणाऱ्या पुलावर रिक्षा उलटून एक वृद्ध ठार ...

मुराद पटेलशिरवळ : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ (ता.खंडाळा) येथे एसटी स्टँड समोर असणाऱ्या पुलावर रिक्षा उलटून एक वृद्ध ठार झाला. तर एकजण जखमी झाला. वसंत हरिभाऊ पोळ (वय ६५, रा.बोरीव पोस्ट रहिमतपूर ता.कोरेगाव) असे मृताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि.१५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रिक्षा चालक नवनाथ पोळ हे वडील आजारी असल्याने कुटूंबियांसमवेत रिक्षा (क्रं-एमएच-४३-बीसी-८३८५) मधून कोरेगाव बाजूकडे येत होते. दरम्यान, शिरवळ गावच्या हद्दीत नवनाथ यांचे रिक्षावरील नियंत्रण सुटून रिक्षा महामार्गावरील संरक्षक कठड्याला धडकून रिक्षा उलटली. अपघाताची माहिती मिळताच तत्काळ शिरवळ पोलीस स्टेशनचे कर्मचारी व शिरवळ रेस्क्यू टिमच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वसंत पोळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर जखमी सुनेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृत वसंत पोळ यांचे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली आहे. याबाबत प्रीती पोळ यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक नयना कामथे हे अधिक तपास करीत आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यू