स्ट्रॉबेरीच्या मळ्यात ‘सफरचंदा’ची बाग! महाबळेश्वरच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 09:31 AM2024-02-23T09:31:02+5:302024-02-23T09:31:12+5:30

सफरचंद हे जम्मू-काश्मीर, हिमाचल या थंड प्रदेशातील मुख्य फळ. महाबळेश्वरातही या फळाची लागवड करता येऊ शकते, असा विचार आजवर कोणीही केला नव्हता. परंतु अलीकडच्या काही वर्षांत येथील शेतकरी नवनवे प्रयोग राबवून शेती समृद्ध करू लागले आहेत.

An apple garden in a strawberry farm A successful experiment of a farmer of Mahabaleshwar | स्ट्रॉबेरीच्या मळ्यात ‘सफरचंदा’ची बाग! महाबळेश्वरच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

स्ट्रॉबेरीच्या मळ्यात ‘सफरचंदा’ची बाग! महाबळेश्वरच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

सचिन काकडे

सातारा : महाबळेश्वरचे नाव घेतले की, आठवतात लाल चुटूक स्ट्रॉबेरी. परंतु येथील अनिल किसन दुधाणे या शेतकऱ्याने स्ट्राॅबेरीबरोबरच सफरचंदाची बाग फुलविण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे.

तसं पाहिलं तर सफरचंद हे जम्मू-काश्मीर, हिमाचल या थंड प्रदेशातील मुख्य फळ. महाबळेश्वरातही या फळाची लागवड करता येऊ शकते, असा विचार आजवर कोणीही केला नव्हता. परंतु अलीकडच्या काही वर्षांत येथील शेतकरी नवनवे प्रयोग राबवून शेती समृद्ध करू लागले आहेत.

हिमाचल प्रदेशातून आणली रोपे

खिंगर (ता. महाबळेश्वर) येथील अनिल दुधाणे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांनी हिमाचल प्रदेशातून सफरचंदाच्या सोनेरी, रेड डेलिशिअस, लाल अंबरी, मॉकीटोश व हार्माेन-९९ या जातींची वीस रोपे आणली.

कलम करून लागवड केली. कोणत्याही खतांचा वापर न करता केवळ मातीतील पोषण द्रव्यावर व ऊन, वारा, पाऊस झेलत ही झाडे तग धरून उभी राहिली. यातील हार्माेन-९९ या झाडांच्या फळांचा हंगाम सुरू झाला असून, दोन झाडे फळांनी लगडली आहेत. हा अनोखा प्रयोग शेतकऱ्यांच्या कुतूहलाचा विषय ठरला आहे.

ही आहेत वैशिष्ट्ये...

हार्माेन-९९  झाडांची उंची १२ फूट

रंगसंगती काश्मिरी फळांप्रमाणे

वजन जेमतेम, चव आंबड-गोड

झाड ४० ते ४५ अंश तापमानातही जगू शकते

सध्या हार्मोन-९९ या जातीच्या सरफचंदांच्या झाडांना फळे आली आहेत. आजवर कोणत्याही खतांचा वापर केलेला नाही; मात्र शेणखताचा वापर केल्यानंतर काय बदल होतो, याचाही अभ्यास करणार.

- अनिल दुधाणे, प्रगतशील शेतकरी

Web Title: An apple garden in a strawberry farm A successful experiment of a farmer of Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.