शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

आॅनलाईन सातबारासाठी १५ रुपये मोजावे लागणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 8:59 PM

सातारा : डिजिटल सातबारा उतारा आॅनलाईन काढण्यासाठी १५ रुपये मोजावे लागणार आहेत. यातील दहा रुपये हे तलाठ्यांना मिळणार असून, ...

ठळक मुद्देशासनाचा निर्णय : तलाठ्यांना १० तर राज्याच्या तिजोरीत ५ रुपयांची भर

सातारा : डिजिटल सातबारा उतारा आॅनलाईन काढण्यासाठी १५ रुपये मोजावे लागणार आहेत. यातील दहा रुपये हे तलाठ्यांना मिळणार असून, राज्य सरकारच्या तिजोरीत ५ रुपयांची भर पडणार आहे.

राज्य शासनाने सातबारा उतारा डिजिटल करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा उतारा उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्यात सुमारे अडीच कोटी सातबारा उतारे आहेत. आतापर्यंत ५० लाखांहून अधिक साताबाराचे डिजिटायझेशनचे काम पूर्ण झाले आहे. तर डिजिटायझेशन पूर्ण झालेले आणि त्यावर स्वाक्षरी असणारा सातबारा उतारा आॅनलाईन माध्यमातून शेतकºयांना देण्यात येत आहेत. त्यासाठी काही प्रमाणात शुल्क आकारण्यात येत होते. त्याची निश्चिती नव्हती. आता मात्र सातबारासाठी १५ रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही लवकरच करण्यात येणार आहे.साताºयात १४ लाख उतारे...

सातारा जिल्ह्यात १४ लाख २३ हजार ९६९ सातबारा उतारे आहेत. नेहमी काही ना काही कारणांसाठी सातबारा लागतोच. तर दररोज बँक, सोसायटी, पतसंस्था, इतर कर्जप्रकरणे व अन्य कामांसाठी ५० हजारांच्या वर उतारे काढण्यात येतात. या माध्यमातून शासनाला ५ रुपयांप्रमाणे अडीच लाखांच्यावर महसूल प्राप्त होणार आहे. तर तलाठ्यांनाही लॅपटॉप, प्रिंटर, शाई, कागद, वीज आदींसाठी १० रुपये प्रति सातबारामागे मिळणार आहेत.

 

टॅग्स :onlineऑनलाइनSatara areaसातारा परिसर