अमित शहांची मस्ती लवकरच उतरेल - पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 05:09 AM2019-04-21T05:09:57+5:302019-04-21T05:10:34+5:30

‘नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर अमित शहा लोकांना समजले. ते त्याआधी तुरुंगात होते, एवढीच माहिती आम्हाला होती, शरद पवार को उखाडेंगे, असं आता ते म्हणतात. त्यांची मस्ती लवकरच उतरेल,’ अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली.

Amit Shah's fun will soon come - Pawar | अमित शहांची मस्ती लवकरच उतरेल - पवार

अमित शहांची मस्ती लवकरच उतरेल - पवार

Next

सातारा : ‘नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर अमित शहा लोकांना समजले. ते त्याआधी तुरुंगात होते, एवढीच माहिती आम्हाला होती, शरद पवार को उखाडेंगे, असं आता ते म्हणतात. त्यांची मस्ती लवकरच उतरेल,’ अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली.
राष्ट्रवादी-काँगे्रस व मित्र पक्षांच्या आघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते.

खा. पवार म्हणाले, ‘खासदार उदयनराजे भोसले हे मोकळ्या अंत:करणाचे आहेत. त्यांना सामान्य लोकांवर झालेला अन्याय सहन होत नाही. आता त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी सातारकर जनतेने घ्यावी. लोकसभा निवडणुकीत मतदान मशीनमध्ये गडबड केली जाऊ शकते. अकोल्यात ही बाब निदर्शनास आली होती. कुठल्याही पक्षाला मतदान केले तरी मतदान कमळालाच होत होते. ही गोष्ट साताऱ्यातही घडू शकते. उदयनराजेंच्या प्रेमापोटी त्यांना तुम्ही मतदान करणार व ते भलत्याच जाऊ शकते, हे लक्षात घ्या.’

Web Title: Amit Shah's fun will soon come - Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.