शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

सातारानजीक लिंबच्या पेरूसाठी अमेरिकन प्राध्यापकाची धडपड, लोकांच्या परसबागेत वाढत आहेत कलमे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 14:15 IST

सातारानजीक असणारा लिंबचा पेरू नामशेष होण्याच्या मार्गावर असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून तोे देश-विदेशात पोहोचला आहे. या दुर्मीळ पेरूला वाचविण्यासाठी एका अमेरिकन मराठी प्राध्यापकाने पुढाकार घेतला असून पेरूची छाट कलमे करून राज्यभरात त्यांनी आपल्या मित्रांच्या परसबागेत वाढवण्याचे काम सुरू केले आहे.

ठळक मुद्देसातारानजीक लिंबच्या पेरूसाठी अमेरिकन प्राध्यापकाची धडपडलोकांच्या परसबागेत वाढत आहेत कलमे

सातारा : सातारानजीक असणारा लिंबचा पेरू नामशेष होण्याच्या मार्गावर असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून तोे देश-विदेशात पोहोचला आहे. या दुर्मीळ पेरूला वाचविण्यासाठी एका अमेरिकन मराठी प्राध्यापकाने पुढाकार घेतला असून पेरूची कलमे करून राज्यभरात त्यांनी आपल्या मित्रांच्या परसबागेत वाढवण्याचे काम सुरू केले आहे.सातारा तालुक्यातील लिंब गाव हे ऐतिहासिक बारा मोटाच्या विहिरीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर लिंबमध्ये पिकणारा चविष्ट आणि दर्जेदार पेरुही एकेकाळी प्रसिद्ध होता. छत्रपती प्रतापसिंह (थोरले) महाराजांनी या गावात पेरूच्या बागा लावल्या होत्या. सातारचे राजघराणे इतर राजांना नजराणा म्हणून लिंबचे पेरू भेट देत असत. त्याची चव आणि रंगामुळे सुमारे दोनशे वर्षांपासून लिंबचा पेरू देश-विदेशात जात होता. त्यामुळे गावात साधारण शंभर एकर परिसरात पेरूच्या बागा होत्या.

अनेकांना पेरूच्या विक्रीतून चांगले पैसे मिळत होते. मात्र, गेल्या काही दशकांत ऊस शेतीमुळे शेतकऱ्यांनी पेरूच्या बागा काढून उसाची लागवड केली. परिसरात हळूहळू ऊस वाढू लागल्याने लोकरी मावा, फळमाशी आदी रोग पेरूवर पडू लागले. उत्पादन घटल्याने हळूहळू पेरूच्या बागा कमी-कमी होत गेल्या अन् हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच झाडे शिल्लक राहिली.साताऱ्याचे हे वैभव नष्ट होत असताना रवींद्र वर्णेकर, संजय कोल्हटकर आदी मंडळींनी सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली. त्याचबरोबर इतरांनाही हा देशी पेरू वाचवण्याचे आवाहन केले. सोशल मीडियाद्वारे ही माहिती देश-विदेशात पोहोचण्यास सुरुवात झाली.

दरम्यान, अमेरिकेत स्थायिक झालेले प्राध्यापक मिलिंद रानडे यांनी ही पोस्ट वाचली. त्यांनी त्याबाबत महाराष्ट्रातील काही मित्रांशी संपर्क साधून लिंबचा पेरू वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याची योजना आखली. त्यानुसार डिसेंबरमध्ये प्राध्यापक रानडे लिंबमध्ये पोहोचले. त्यांनी लिंबमध्ये शिल्लक असलेल्या पेरूची झाडे पाहिली.

ती वाचवण्यासाठी रवींद्र वर्णेकर यांच्या मदतीने गुटी कलमे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते शक्य नसल्याने त्यांनी फांद्या छाटून छाट कलमे करण्यास सुरुवात केली. प्राथमिक स्तरावर रानडे यांनी देशातील विविध ठिकाणी शाश्वत ग्रामविकासावर काम करणाऱ्या लोकांना लिंबच्या पेरूची कलमे दिली. आजच्या घडली दापोली, जव्हार, पालघर, औरंगाबाद, पुणे, मुंबईत राहणाऱ्यां काही लोकांच्या परसबागेत लिंबच्या पेरूची कलमे वाढत आहे.

सातारा, वाई व महाबळेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात जैव विविधता आहे. या भागात अनेक दुर्मीळ झाडे व वनस्पती आहे. तिचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. लिंबच्या पेरूची कलमे करून सर्वत्र पोहोचविण्याचे काम करणार आहे.प्रा. मिलिंद रानडे 

औधषी गुणधर्मलिंबच्या पेरु हा चवीला अतिशय गोड असतो. त्याचा रंग पारंपरिक हिरवा व काहीसा गुलाबी असतो. त्याच्या पानात अलौकिक औषधी गुण आहेत. पचनसंस्था सुरळीत करण्यासाठी व नशेचा प्रभाव कमी करण्यासाठी सातारकर या पेरूच्या पानांचा वापर करत असतात.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरenvironmentवातावरण