पारंपरिक शेतीला डावलून दीड एकरात पेरूची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 10:31 PM2017-11-29T22:31:54+5:302017-11-29T22:32:32+5:30

Peruvian cultivation for one and a half acres of traditional farming | पारंपरिक शेतीला डावलून दीड एकरात पेरूची लागवड

पारंपरिक शेतीला डावलून दीड एकरात पेरूची लागवड

Next
ठळक मुद्देउच्च प्रतिच्या पेरूची मागणी : अनेक शेतकरी वळले फळबाग शेतीकडे

मोहन भोयर ।
आॅनलाईन लोकमत
तुमसर : शेतकऱ्यांनी वारंवार होणाऱ्या दुष्काळाला पाहून शेतकरी आता पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळले आहे. तालुक्यातील एका शेतकऱ्याने नवीन प्रजातीच्या पेरूची लागवड दीड एकरात करून त्याची जोपासना केली आहे.
वारंवार निसर्ग शेतकऱ्याला हुलकावणी देतो व त्यामुळे त्याला नापिकीचा सामना करावा लागते सततच्या नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे सरकारचे शेती विरोधी धोरण तर दुसरीकडे निसर्गाची साथ मिळत नसल्याने शेतकºयांनी शेतीचा आता मार्ग बदलविला आहे. पारंपरिक शेतीला पाठ दाखवत तालुक्यातील महेश मेश्राम यांनी दीड एकर मध्ये ५५० पेरूची झाडे लावले.
औषधीयुक्त नवीन प्रजातीच्या पेरूची लागवड करून त्यांची जोपासना करीत आहे. मेश्राम यांना ही बाब विचारली असता त्यांनी सांगितले काहींनी त्याला पेरूच्या शेतीसाठी मार्गदर्शन केले. महेशने शेतीत २०१४ मध्ये या झाडांची लागवड केल्याचे सांगितले. तीन वर्षाच्या जोपासन्याचा कालावधी झाला आहे. एका झाडाला जवळपास ३० ते ५० पेरू लागलेले आहेत. या पेरूला विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हेही पेरू डायबिटीज, हार्ट अटॅक अशा रुग्णांकरिता उपयुक्त आहे. त्यामुळे या प्रजातीची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.
हा पेरू अर्धा ते एक किलो वजनाचा असतो आणि स्थानीय बाजारात याला २० ते ३० रूपये प्रति किलो भाव येतो. पण नागपूरला गेलो असता या झाडाला ५० ते ६० होते. तो दिल्लीला विकण्याकरिता पाठवलं तर त्याला शंभर ते दीडशे रूपये प्रति किलो एवढे भाव मिळतात. झाडांची जोपासना कराण्याला मेहनत घ्यावी लागली.
पेरू मोठे झाले असून त्याच्या संरक्षणासाठी जाळी लावावी लागली आहे. त्याच्यावर ती विशेष स्वरूपाचे पॉलिथिन लावावी लागते. यामुळे या पेरूची गुणवत्ता वाढते. ही प्रजाती छत्तीसगड येथे प्रसिद्ध आहे आणि या शेतकºयाने ही प्रजातीची पेरू प्रति झाडाला दीडशे रूपये देऊन विकत आणले. ज्या कंपनीकडून विकत घेतले त्यांनी लागवडीपासून याला मार्गदशनही केले आणि सेवा सुद्धा दिली.
आजही कंपनीचे कर्मचारी येऊन याची पाहणी करून जातात. त्यामुळे शेतकºयाला घेणे सोपे जाते याबद्दल शेतकऱ्याला विचारले असता त्यांनी सांगितले की, आपल्याला सुरवातीला मेहनत करावे लागते. त्यानंतर या फळबागाचा लाभ आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळणार असल्याचे सांगितले.
हे झाड सतत सहा महिन्यापर्यंत फळे देतो. यामुळे या फळबागपासून प्रतिवर्ष चार ते पाच लाखांचा लाभ होण्याची शक्यता शेतकऱ्याने वर्तविले आहे. या नाविण्यपूर्ण शेतीची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांना मिळाल्यानंतर त्यांनी शेतीला भेट देऊन पेरू शेतीची माहिती जाणून घेतली. यावेळी एॅग्रो असोसिएशनचे सचिव सुनिल पारधी, पंचायत समितीचे माजी सभापती कमाल शेख यांनीही शेतीला भेट देऊन माहिती घेतली.
मात्र आता पेरूची लागवड बघून अनेकांनी पारंपारिक शेतीला सोडून फळबागाची शेती करण्यावर भर दिला आहे.

Web Title: Peruvian cultivation for one and a half acres of traditional farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.