शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

स्वकीयांकडून घात; परकीयांकडून हात : राष्ट्रवादीअंतर्गत कलह वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:28 IST

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीअंतर्गत राजकीय वातावरण तापत असून, साताऱ्यातून लोकसभेसाठी पुन्हा खासदार उदयनराजेंना उमेदवारी देण्यास दिवसेंदिवस विरोध वाढू लागला आहे. त्यातच खासदारांसाठी भाजप, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि ‘रिपाइं’ने आॅफर देऊन जाळे टाकले

ठळक मुद्देउदयनराजेंवर भाजप, स्वाभिमान, ‘रिपाइं’चे जाळे स्वपक्ष नसेल तर आॅफर हाच पर्याय

नितीन काळेल ।सातारा : पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीअंतर्गत राजकीय वातावरण तापत असून, साताऱ्यातून लोकसभेसाठी पुन्हा खासदार उदयनराजेंना उमेदवारी देण्यास दिवसेंदिवस विरोध वाढू लागला आहे. त्यातच खासदारांसाठी भाजप, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि ‘रिपाइं’ने आॅफर देऊन जाळे टाकले आहे. त्यामुळे उदयनराजेंसाठी स्वपक्ष नसलातरी आॅफर हाच शेवटचा पर्याय ठरणार आहे.

एकंदरीतच सद्य:स्थितीवरून खासदार म्हणून उदयनराजेंना पक्षांतर्गत विरोध आहे. तर इतर पक्षांच्या आॅफरवरून उदयनराजेंसाठी सर्वकाही असाच अर्थ आता निघू लागला आहे.

२००९ ला मतदारसंघाची पुनर्रचना झाली. तेव्हापासून उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. गेल्या दोन टर्मपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून येत आहेत. तिसरी टर्मही त्यांना स्वपक्षाकडून लढवायची आहे; पण आता त्यांच्या मार्गात पक्षातील अनेकांकडून अडथळे आणण्याचा वारंवार प्रयत्न होत आहे. त्यामुळे उदयनराजेंना स्वकीयांचाच कडवा विरोध होत आहे. सातारा, बारामती येथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरही जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी खासदारांबद्दल खदखद व्यक्त केली. या घटना घडत होत्या त्या-त्यावेळी उदयनराजेंनी पवार यांना भेटून सल्लामसलत केली.

सातारा, बारामती बैठकीत विरोध झाल्यानंतर मुंबईतील पक्षाच्या बैठकीत पुन्हा उदयनराजेंच्या उमेदवारीला तीव्र विरोध झाल्याचे दिसून आले. ही स्थिती म्हणजे जिल्ह्यातील राष्ट्रवादीत सर्वकाही सुरळीत चालले आहे, हे दर्शवित नाही. एकप्रकारे उदयनराजे यांना लोकसभेची उमेदवारी मिळू नये, यासाठीच आटापिटा असल्याचे समोर येते.

मुंबईतील बैठकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी लढा दिला. शिवेंद्रसिंहराजेंचे कार्यकर्ते शरद पवार यांच्यासमोरच उदयनराजेंविरोधात बोलतात या पाठीमागे कोणीतरी आहे, असाच अर्थ निघतो. त्याशिवाय शिवेंद्रसिंहराजेंचे कार्यकर्ते मोठे धाडस करणार नाहीत. त्यातच आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि खासदार उदयनराजे यांच्यातील व त्यांच्या कार्यकर्त्यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सद्य:स्थितीत आपण एकत्र येऊ शकत नाही, हेच दाखवून देतात. त्यामुळेच उदयनराजेंना शक्य असेल तेथे विरोध करायचा, हेच मनोमन ठरविल्याचे स्पष्ट होते.

मुंबईच्या याच बैठकीत खंडाळ्यातील दत्तानाना ढमाळ, रमेश धायगुडे याशिवाय खुद्द जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनीही सातारा लोकसभेसाठी राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजेंचे नाव पुढे आणले. यावरून उदयनराजेंना विरोध म्हणूनच रामराजेंचे नाव पुढे आणल्याचे स्पष्ट होते. त्यातच रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील संघर्ष गेल्या सहा महिन्यांत आणखी तीव्र झाला आहे. दोघेही एकमेकांच्या विरोधात बोलण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे पक्षांतर्गतच नव्हे तर जिल्ह्णातीलच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. उदयनराजेंना रामराजेच सद्य:स्थितीत तुल्यबळ लढत देऊ शकतात. यासाठीच सर्व व्यूहरचना सुरू असल्याचे दिसते; पण उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत शरद पवार हेच अंतिम निर्णय घेणार आहेत.

सद्य:स्थितीत उदयनराजेंना विरोध करणे सर्वांनाच अवघड होणार आहे. त्यामुळे राजकारणात जर-तरच्या स्थितीलाही महत्त्व असते. सध्या कितीही विरोध झाला तरी निवडणुकीला बराच कालावधी असल्याने पुलाखालून बरेच पाणी जाणार आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी पुढेही झडतील.भडका की थंडावणार...खासदार म्हणून उदयनराजेंना विरोध होत असताना दुसरीकडे भाजपसह, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, ‘रिपाइं’ने उदयनराजेंना आॅफर दिली आहे. ‘राष्ट्रवादीत अपमान सहन करण्यापेक्षा भाजपमध्ये या,’ असे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी सल्ला दिला आहे. नितेश राणे यांनी तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे. असे असतानाच केंद्रीय मंत्री व ‘रिपाइं’चे रामदास आठवले यांनीही यामध्ये उडी घेतली आहे.

‘पक्षाची उमेदवारी स्वीकारल्यास ‘रिपाइं’चे राष्ट्रीय पदही देऊ,’ अशी आॅफर देऊ केली आहे. यावरून उदयनराजेंसाठी स्वपक्षाचे दरवाजे बंद झाले तर मित्रांकडून त्यांचे स्वागतच होणार आहे. त्यातच उदयनराजेही म्हणतात, ‘सर्वच पक्षांत माझे मित्र आहेत.’ यावरूनच उदयनराजेंसाठी सर्व काही शक्य आहे. निवडणुकीला अवकाश असलातरी सध्या वातावरण पेटू लागले आहे. त्याचा भडका होणार की हे वादळ थंडावणार, यासाठी अजून काही वेळ जाऊ द्यावा लागणार आहे.भाजपमध्ये उदयनराजेही गेले तर विरोधचकोकाटे: साताºयातील पत्रकार परिषदेत वक्तव्य, दिलीप येळगावकर यांचाही निषेधसातारा : ‘भाजपमध्ये खासदार उदयनराजे नव्हे तर सख्खा भाऊ जरी गेला तरी त्यांच्या विरोधात काम करणार,’ अशी स्पष्ट भूमिका संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांनी जाहीर केली. ‘त्याचबरोबर जेम्स लेनचे प्रकरण क्षुल्लक आहे, असे वक्तव्य करणाºया आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांचा आम्ही निषेध करतो. त्यांनी जाहीर माफी मागावी,’ अशी मागणीही यावेळी त्यांनी साताºयातील आयोजित पत्रकार परिषदेत केली.

महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक लिखाण करणारे जेम्स लेन क्षुल्लक विषय आहे, असे धाडस करणाºया आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांचा संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांनी पुण्यावरून येऊन निषेध केला. आमदार येळगावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साताºयातील पोवई नाक्यावरील पुतळ्याजवळ येऊन नाक घासून समस्त महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी कोकाटे यांनी यावेळी केली.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी डॉ. दिलीप येळगावकर यांची भाजप पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.भाजप विचारधारा असल्यामुळे भाजप संविधान मानत नाही. हुकूमशहा पद्धतीने राज्य व देश चालविला जात आहे. एव्हीएम मशीन घोटाळा आणि नोटाबंदी करून पैशाचे केंद्र्रीकरण, जातीय धार्मिक भावना भडकविल्या जातात.

शिवद्र्रोही व जेम्स लेनला माहिती पुरविणारे ब्राह्मणशाही बाबा पुरंदरेंना राजभवनात अडीचशे लोकांच्या उपस्थितीत चोरून महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. याचा न्या. पी. बी. सावंत यांच्यासह अनेक विचारवंतांनी विरोध केला होता.भाजपमध्ये नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम, आ. अतुल पाटकळकर, घाटकोपरचे आ. राम कदम, पंढरपूरचे आ. प्रशांत परिचारक यांनी सुद्धा अकलेचे तारे तोडले आहेत. ही भाजप संस्कृती विकृत बनली आहे. महाराष्ट्रात पेशवाई आली का? असाही सवाल कोकाटे यांनी यावेळी उपस्थित केला.

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर