शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या धास्तीने मित्रपक्ष सावध; सातारा जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेची गणिते जुळवण्याचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 17:10 IST

शिंदेसेना, राष्ट्रवादीच्या गटनोंदणीसाठी हालचाली

सातारा : जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेची गणिते जुळवण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांकडून होऊ लागला आहे. तांत्रिकदृष्ट्या कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदेसेनेने सावध भुमीका घेत गट नोंदणीची प्रक्रियाही सुरू केली. शिंदेसेनेने शुक्रवारच्या बैठकीनंतर त्वरित सदस्यांच्या स्वाक्षरी घेत गटनोंदणी केली आहे.सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला २७, शिवसेनेला १५ तर राष्ट्रवादी पक्षाला २० जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे कोणताही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही. एकीकडे राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेकडून भाजपाला दूर ठेवून सत्ता स्थापनेचे मनसुबे आखले जात आहेत. दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. नुकतीच भाजपाचे मंत्री जयकुमार गोरे यांनी मुंबइत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यांनी जिल्हा परिषद निकाल व सद्यस्थिती मांडली आहे.संख्येने मोठा असलेल्या भाजपला फक्त सहा सदस्यांची गरज आहे. दोन अपक्ष व अन्य चार यांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपाचे धुरंधर राजकीय कौशल्य पणाला लावणार यात शंका नाही. भाजपाच्या रणनीतीचा अंदाज असलेल्या शिंदेसेना आणि राष्ट्रवादीने फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी वेळ न दवडता कायदेशीर बाबींची पूर्तता सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्काराच्या निमित्ताने गटनेता आणि गट नोंदणीवर लक्ष केंद्रीत केले आहे. व्हीप जारी करण्याच्या अनुषंगाने या हालचाली असल्याचे दिसत आहे.राष्ट्रवादी (अजित पवार) यांनी सदस्यांच्या गटनोंदणीसाठी सह्या घेतल्या असून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणी करण्यात येणार आहे. शिंदेसेनेने शुक्रवारीच गटनोंदणी करून घेतली आहे. दरम्यान, भाजपाच्या सदस्यांचा शनिवारी सत्कार होणार असून या पक्षाकडूनही सोमवारी गटनोंदणी होऊ शकते.

सॉफ्ट टार्गेटवर नजरजिल्हा परिषदेत आवश्यक संख्याबळ जमण्यासाठी कोणते सदस्य भाजपाला साथ देऊ शकतात, त्यांचा अंदाज घेतला आहे. अशा सॉफ्ट टार्गेटवर लक्ष असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Alliances shift in Satara Zilla Parishad amid BJP's influence.

Web Summary : Satara Zilla Parishad sees post-election alliance efforts. NCP and Shinde Sena register groups cautiously, fearing BJP's strategy to gain control. BJP eyes support to reach majority.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६Satara areaसातारा परिसरMahayutiमहायुतीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना