दारूच्या नशेत युवकाला मारहाण; तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 18:02 IST2019-05-31T17:59:33+5:302019-05-31T18:02:41+5:30

काही कारण नसताना दारूच्या नशेत नवाज महम्मद खान (वय २२, रा. गुरुवार पेठ, सातारा) या युवकाला बेदम मारहाण केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सातारा येथील प्रसाद अमृत मोरे (वय ३६) यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने ६० हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविल्याची घटना घटना गुरुवारी उघडकीस आली.

Alcohol drunken; Crime against trio | दारूच्या नशेत युवकाला मारहाण; तिघांवर गुन्हा

दारूच्या नशेत युवकाला मारहाण; तिघांवर गुन्हा

ठळक मुद्देदारूच्या नशेत युवकाला मारहाण; तिघांवर गुन्हाऔद्योगिक वसाहतीत घरफोडी; ६० हजारांचा ऐवज लांबविला

सातारा : काही कारण नसताना दारूच्या नशेत नवाज महम्मद खान (वय २२, रा. गुरुवार पेठ, सातारा) या युवकाला बेदम मारहाण केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

निरंजन भोसले, सोन्या कांबळे, शुभम चव्हाण (सर्व रा. गुरुवार पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवाज खान हा गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सिटी पोस्टजवळ उभा होता. यावेळी काही कारण नसताना संबंधितांनी दारूच्या नशेत नवाजला मारहाण केली.

औद्योगिक वसाहतीत घरफोडी; ६० हजारांचा ऐवज लांबविला

सातारा येथील औद्योगिक वसाहतीमधील श्यामलीला लक्ष्मीनगर परिसरात राहणारे प्रसाद अमृत मोरे (वय ३६) यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे ६० हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविल्याची घटना घटना गुरुवारी उघडकीस आली.

मोरे कुटुंबीय काही दिवस बाहेरगावी गेले होते. गुरुवारी दुपारी हे कुटुंबीय परत आल्यानंतर त्यांच्या घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड, मोबाईल, हार्ड डिस्क, पेनड्राईव्ह असा सुमारे ६० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

Web Title: Alcohol drunken; Crime against trio