शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांनी कासला दिले २५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : वाढीव निधी मिळत नसल्याने साताराकरांचा जीवनदाता असलेल्या कास धरणाला मंजूर ५८ कोटींपैकी २५ कोटी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : वाढीव निधी मिळत नसल्याने साताराकरांचा जीवनदाता असलेल्या कास धरणाला मंजूर ५८ कोटींपैकी २५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता नुकताच सातारा पालिकेकडे वर्ग झाला आहे. अजित पवारांनी निधी दिल्याने कास धरणाचे रखडलेले काम पुन्हा सुरू होणार असून, हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास नेऊ, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.

शिवेंद्रसिंहराजेंनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा शहरासह कास मार्गावरील १५ गावांचा पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी मिटण्यासाठी कास धरणाची उंची वाढवणे आवश्यक होते. त्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून कास धरणाची उंची वाढवण्याचे काम मंजूर करून घेतले होते. त्याचवेळी राज्याच्या पाणी पुरवठा विभागाकडून निधीही उपलब्ध करून घेण्यात आला होता; तसेच वन विभाग, हरित लवाद यांसह अनेक विभागाच्या परवानग्याही आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या अथक पाठपुराव्यातून मिळवण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. सद्यपरिस्थितीत कास धरण प्रकल्पाचे काम ७५ ते ८० टक्के पूर्ण झाले आहे; मात्र वाढीव निधीची तरतूद न झाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून पुढील काम रखडले आणि कास धरण प्रकल्प पूर्णत्वास जाणार का? साताराकरांचा पाणीप्रश्‍न सुटणार का, असे प्रश्‍न निर्माण झाले होते; मात्र पुन्हा एकदा आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार ना. अजित पवार यांनी या प्रकल्पासाठी वाढीव ५८ कोटी निधी मंजूर करून दिला.

आ. शिवेंद्रसिंहराजे आणि ना. अजित पवार यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळेच हद्दवाढ मंजूर झाली. मेडिकल कॉलेजचा प्रश्न सुटला, तसेच साताराकरांच्या जिव्हाळ्याच्या कास धरण प्रकल्पाला मंजुरी मिळाली आणि वाढीव निधीही उपलब्ध झाला. आता ५८ पैकी २५ कोटींचा पहिला हप्ता नुकताच सातारा पालिकेकडे वर्ग करण्यात आला असून, कास धरणाचे बंद पडलेले काम आता पुन्हा सुरू होणार आहे. जसजसे काम पुढे जाईल, तशी उर्वरित रक्कमही पालिकेला मिळेल आणि हा प्रकल्प येत्या काही दिवसात पूर्णत्वास जाणार आहे.

चौकट

हद्दवाढीत समाविष्ट रस्त्यांची कामे मार्गी लागणार

शिवेंद्रसिंहराजे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागातील रस्त्यांसाठी निधीची मागणी केली होती. शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच या रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध होणार आहे.