सातारा येथील गोडोलीजवळ वाहनाची धडक बसल्याने मालवाहतूक रिक्षा ओढ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 13:54 IST2017-11-29T13:49:48+5:302017-11-29T13:54:55+5:30
सातारा येथील गोडोलीजवळ पाठीमागून जीपने धडक दिल्याने माल वाहतूक रिक्षा खोल ओढ्यात कोसळली. यामध्ये एकजण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, क्रेनच्या साह्याने रिक्षा बाहेर काढण्यात आली. सोमवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

सातारा येथील गोडोलीजवळ वाहनाची धडक बसल्याने मालवाहतूक रिक्षा ओढ्यात
सातारा : येथील गोडोलीजवळ पाठीमागून जीपने धडक दिल्याने माल वाहतूक रिक्षा खोल ओढ्यात कोसळली. यामध्ये एकजण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, क्रेनच्या साह्याने रिक्षा बाहेर काढण्यात आली. सोमवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, सोमवारी सकाळी मालवाहतूक रिक्षा सातारा-रहिमतपूर रस्त्यावरून जात होती. येथील गोडोलीजवळ या रिक्षाला पाठीमागून आलेल्या जीपने धडक दिली. यामुळे रिक्षा रस्त्यावरून खाली जाऊन खोल ओढ्यात कोसळली.
या अपघातानंतर बघ्यांची गर्दी झाली. सकाळी साडे अकराच्या सुमारास क्रेनच्या साह्याने ओढ्यातून रिक्षा बाहेर काढण्यात आली. या अपघातात एकजण जखमी झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे.