शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्ते जोमात; मोबाईल कोमात----ऐका दाजिबा..

By admin | Updated: September 17, 2014 22:25 IST

खरंय राव. कार्यकर्ते फुल्ल चार्ज; पण मोबाईलला मिळंना रिचार्ज!

‘म्या काय म्हंतू धुरपदामावशे, चार बायका जमवायची कला हाय तुज्याकडं. आन् आतातर तुज्याकडं मोबाईलबी हाय. तवा सांच्याला वाड्यातल्या बायकास्नी वट्यावर जमवायचं काम तुझं आन् रिचार्ज मारायचं काम माझं. उंबऱ्यावर बसून दाजिबानं सांगितलं.‘ये मुडद्या उगं कसल्याबी भानगडीत नगं पाडूस मला. आन समद्या बायकास्नी बोलवूनशान तू काय मलिदा वाटणार हायस का त्यास्नी. दिसभर कष्टावल्यालं आंग भुईला टेकवायच्या वक्ताला त्यास्नी बोलवायला कसली धाड भरलीया तुला? सकाळी रोजगारासाठी दुसऱ्याच्या बांधावर जावं लागतंया त्यास्नी. तुला रं काय रिकामटेकड्याला. खायला काळ आन् भुईला भार नुसता! घरी बसून ‘रोज’ कोण देणार, तुजा बा?’ ध्रुपदामावशीनं झापलं.‘तुमा बायकास्नी लांबड लावायच भारी हौस. सांगाय लागलं की लगीच टांगायला न्याचं! जरा ऐकून तर घे. आगं, लक्ष्मी चालून आलीय तुमच्या दारात! दाजिबानं हळूच कानात सांगितलं.‘कुणाचं लय वर आलंय? म्हणं लक्ष्मी दारात आलीय! ध्रुपदामावशीनं फटकारलं.‘काय मावशे तुजपण. आगं, आमदारकीचं इलिक्शान लागलंय नव्हं आता. त्या निमतानं उमीदवार आपल्या गावात येणार हायत. तुमी फकस्त तासभर एका जागेवर बसायचं. घरी जाताना प्रत्येकीच्या हातावर नोट ठेवायची जबाबदारी माजी. डोस्क्यानं काम केलं म्हंजी पैसं कमवायला जास्त कष्ट नाय उपसावं लागत. आगं तू फकस्त बायका गोळा कर म्हंजी बग कसा चिमित्कार घडतुया ते. आठ-पंधरा दिस रोजगार करायची गरजच पडणार नाय तुमा बायकास्नी! आता तुज्या हातचा च्या प्याला नंतर येतो. जाता-जाता दाजिबानं मंत्र दिला.‘गड्यांनो, काम फत्ते झालंय बरं. बायकास्नी सांगायचं म्हंजी खायाचं काम नाय!डोस्कं लागतं त्याला. छाती फुगवून दाजिबा बोलला.‘बालिश बहू बायकात बडबडला आसणार. दुसरं काय? लेका, घरात तुजी कमळी तरी तुजं ऐकती का रं. उमीदवार अमूक दिल तमूक दिल, आसं तूच आश्वासन दिलं आसल बायकास्नी! आपल्या मोबाईलवर बॅलन्स मारायला लाव आगूदर उमीदवाराला! त्यांचं फोटो बघूनशान वाटस्अप बंद पडलंय.म्हणं स्टार प्रचारक!’ सदानं टोमणा मारला.एवढंच ना, आता सांगतू. उमीदवाराजवळ आपला लय वट हाय! नाय काय म्हंतील आपल्याला. आयला रेंज गेली वाटतं वाटतं!’ दाजिबा चुकचुकला.ह्याला म्हणायचं भरवशाच्या म्हशीला टोणगा!’ ‘संपर्क दौऱ्याचं’ नियोजन करणाराच संपर्क क्षेत्राच्या बाहेर! अशानं गावात ‘शोभा व्हायची’!’ सदानं खिल्ली उडविली.‘खरंय राव. कार्यकर्ते फुल्ल चार्ज; पण मोबाईलला मिळंना रिचार्ज! हे बरं नव्हं.’ शिरपानं री ओढली.