Satara Crime: फलटण येथील सराईत गुन्हेगार सुरज बोडरेसह १२ जणावर मोक्का कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 19:05 IST2023-02-14T19:05:36+5:302023-02-14T19:05:55+5:30
विकास शिंदे मलटण : फलटण येथील सराईत गुन्हेगार सुरज बोडरे व त्याच्या १२ साथीदारांविरुध्द मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. ...

Satara Crime: फलटण येथील सराईत गुन्हेगार सुरज बोडरेसह १२ जणावर मोक्का कारवाई
विकास शिंदे
मलटण : फलटण येथील सराईत गुन्हेगार सुरज बोडरे व त्याच्या १२ साथीदारांविरुध्द मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. सातारा पोलिसांनी याबाबत माहिती दिली. खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, अपहरण, मारहाण, आर्म अॅक्ट अशा प्रकारचे गंभीर गुन्हे या टोळीवर दाखल होते.
आरोपी टोळी प्रमुख सुरज वसंत बोडरे, (वय २३, रा. ५ सर्कल, खामगाव, ता. फलटण), ज्ञानेश्वर उर्फ नन्या वसंत बोडरे, (२८, रा. ५ सर्कल, खामगाव), उमेश संजय खोमणे (२६, रा. गाडगे महाराज आश्रमशाळेच्या समोर, खराडवाडी), रणजित कैलास भंडलकर (रा. होळरोड, खामगाव), अमर संतोष बोडरे, (रा. पिंपळवाडी), सचिन दत्तात्रय मंडले, (रा. गणेशनगर, साखरवाडी), तानाजी नाथाबा लोखंडे (३०), शरद उर्फ बाबू नंदकुमार पवार (२०), शंभू आनंदा ननावरे (२२, खामगाव), वैभव हणमंत चव्हाण (२६), सनी मोहन बोडरे (२६), श्रीकांत गुलाब बोडरे (३८), गणेश बाळु मदने (१८ रा. खामगाव, ता. फलटण) अशी १३ जणांची नावे आहेत.
टोळी प्रमुख सुरज बोडरे याने दहशत पसरविण्यासाठी फलटण तालुक्यातील इतर गुन्हेगारी टोळीतील सदस्यांना एकत्र करुन दहशत पसरविल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी या टोळीविरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये कारवाई करीता पोलिस अधीक्षकामार्फत विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. याला विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र सुनिल फुलारी यांनी मंजुरी दिली. तर, गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
नोव्हेंबर २०२२ पासुन एकुण ४ मोक्का प्रस्तावामध्ये ४४ इसमांविरुध्द मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई केली आहे. पोलिस अधीक्षक समीर शेख व अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, पोलिस निरीक्षक अरुण देवकर, ग्रामीण पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, पो. उ. नि. सागर अरगडे, गणेश माने, पोलिस अंमलदार अमित सपकाळ, फलटण ग्रामीण पोलिस ठाणेचे पोलीस अंमलदार संजय राऊत, वैभव सूर्यवंशी, अमोल जगदाळे, अभिजित काशिद, अजय कडेकोट, स्वप्निल खराडे यांनी मोक्का कारवाईकरीता सहभाग घेतला.