शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

Satara: वडूजच्या जवानाचा अपघाती मृत्यू, राजस्थान येथे घेत होते युद्ध अभ्यास ट्रेनिंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 18:26 IST

सध्या ते दिल्ली-मेरठ येथे अठरा रेजिमेंटमध्ये अटलरी डिपार्टमेंटमध्ये नाईक सुभेदार या पदावर कार्यरत होते

वडूज : येथील माधवनगरचे सुपुत्र जवान चंद्रकांत महादेव काळे (वय ४०) यांचे बुधवारी रात्री देशसेवा बजावताना अपघाती निधन झाले. ही माहिती समजल्यावर माधवनगरमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.जवान चंद्रकांत काळे हे अठरा मराठा मराठा तोफखाना रेजिमेंटचे राजस्थान येथील महाजन फिल्ड फायरिंग रेंजमध्ये युद्ध अभ्यास ट्रेनिंग घेत होते. यावेळी अपघाती त्यांचे निधन झाले. ते गेली अनेक वर्षे देश सेवेत रुजू होते. त्यांनी यापूर्वी पंजाब, लडाख, जम्मू काश्मीर, सतवारी, नवशेरा, सिकंदराबाद, डाबर तालबेहट, आवेरीपट्टी आदी ठिकाणी देशसेवा बजावली होती. सध्या ते दिल्ली-मेरठ येथे अठरा रेजिमेंटमध्ये अटलरी डिपार्टमेंटमध्ये नाईक सुभेदार या पदावर कार्यरत होते. चंद्रकांत यांचे प्राथमिक शिक्षण वडूज जिल्हा परिषद शाळेमध्ये तर माध्यमिक शिक्षण वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात झाले. माध्यमिक शिक्षण घेत असताना शालेय एनसीसी ग्रुपचे ते सीएचएम होते. शैक्षणिक दशेपासूनच देशसेवेची आवड असणारे चंद्रकांत हे विविध मैदानी खेळात पारंगत होते. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDeathमृत्यू