Satara: वडूजच्या जवानाचा अपघाती मृत्यू, राजस्थान येथे घेत होते युद्ध अभ्यास ट्रेनिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 18:26 IST2025-01-31T18:25:46+5:302025-01-31T18:26:41+5:30
सध्या ते दिल्ली-मेरठ येथे अठरा रेजिमेंटमध्ये अटलरी डिपार्टमेंटमध्ये नाईक सुभेदार या पदावर कार्यरत होते

Satara: वडूजच्या जवानाचा अपघाती मृत्यू, राजस्थान येथे घेत होते युद्ध अभ्यास ट्रेनिंग
वडूज : येथील माधवनगरचे सुपुत्र जवान चंद्रकांत महादेव काळे (वय ४०) यांचे बुधवारी रात्री देशसेवा बजावताना अपघाती निधन झाले. ही माहिती समजल्यावर माधवनगरमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.
जवान चंद्रकांत काळे हे अठरा मराठा मराठा तोफखाना रेजिमेंटचे राजस्थान येथील महाजन फिल्ड फायरिंग रेंजमध्ये युद्ध अभ्यास ट्रेनिंग घेत होते. यावेळी अपघाती त्यांचे निधन झाले. ते गेली अनेक वर्षे देश सेवेत रुजू होते. त्यांनी यापूर्वी पंजाब, लडाख, जम्मू काश्मीर, सतवारी, नवशेरा, सिकंदराबाद, डाबर तालबेहट, आवेरीपट्टी आदी ठिकाणी देशसेवा बजावली होती. सध्या ते दिल्ली-मेरठ येथे अठरा रेजिमेंटमध्ये अटलरी डिपार्टमेंटमध्ये नाईक सुभेदार या पदावर कार्यरत होते.
चंद्रकांत यांचे प्राथमिक शिक्षण वडूज जिल्हा परिषद शाळेमध्ये तर माध्यमिक शिक्षण वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात झाले. माध्यमिक शिक्षण घेत असताना शालेय एनसीसी ग्रुपचे ते सीएचएम होते. शैक्षणिक दशेपासूनच देशसेवेची आवड असणारे चंद्रकांत हे विविध मैदानी खेळात पारंगत होते. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.