दहावीच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 18:21 IST2020-06-26T18:20:51+5:302020-06-26T18:21:25+5:30

वाई-चिखली रोडवरील मुगाव-दसवडी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास झाला. सुमित सत्यवान वाडकर (वय १६) असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. याची वाई पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Accidental death of a 10th standard student | दहावीच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू

दहावीच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू

ठळक मुद्देदहावीच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यूवाई पोलीस ठाण्यात नोंद

वाई : वाई-चिखली रोडवरील मुगाव-दसवडी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास झाला. सुमित सत्यवान वाडकर (वय १६) असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. याची वाई पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुमित वाडकर हा वाई बाजूकडून चिखली-मोर्जीवाडा या त्याच्या गावाकडे दुचाकीवरून गुरुवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास निघाला होता. त्याची दुचाकी मुगाव-दसवडी गावाच्या हद्दीत लोखंडी अँगलने भरलेला टेम्पोला ओव्हरटेक करत असताना समोरून आलेल्या दुचाकीला धडकला.

या धडकेत सुमित गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने अतिरक्तस्त्राव होऊन जागीच मृत्यू झाला. युवकाचा मृत्यू झाल्याने चिखली, मोर्जीवाडा गावावर शोककळा पसरली आहे. सुमित हा दहावीत शिकत होता. आई-वडिलांना तो एकुलता एक मुलगा होता. वाई पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Accidental death of a 10th standard student