ब्रेक निकामी झाल्याने एसटीला अपघात, प्रवाशी सुखरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 13:55 IST2019-12-28T13:53:47+5:302019-12-28T13:55:50+5:30
ब्रेक निकामी झाल्याने एसटीला अपघात झाला. त्याचवेळी त्या गाडीचा मागील गिअरही निखळला. या अपघातातून प्रवासी सुखरूप बचावले. हा सातारा आगारातून सकाळी सुटणारी सातारा-कास-धावली या गाडीला शनिवारी सकाळी झाला.

ब्रेक निकामी झाल्याने एसटीला अपघात, प्रवाशी सुखरूप
बामणोली : ब्रेक निकामी झाल्याने एसटीलाअपघात झाला. त्याचवेळी त्या गाडीचा मागील गिअरही निखळला. या अपघातातून प्रवासी सुखरूप बचावले. हा सातारा आगारातून सकाळी सुटणारी सातारा-कास-धावली या गाडीला शनिवारी सकाळी झाला.
घटनास्थळावरूण मिळालेल्या माहितीनुसार, धावली गावात जाण्यासाठी एसटी निघाली होती. ती धावली फाट्यावरून वळून पहिल्या वळणातून खाली गेल्यावर ब्रेक निकामी झाल्याचा अंदाज चालकाला आला. त्यावर चालकाने गाडीचा रिवर्स गिअर टाकून गाडी थोडी मागे घेत सर्व प्रवाशी गाडीतून खाली उतरवले नंतर गाडी मागे घेत असताना मागे चढण व पुढे तीव्र उतार व वेडीवाकडी वळणे आहेत त्यात एस टी चा रिवर्स टाकलेला गिअर निसटला.
ब्रेक निकामी असल्याने ब्रेक न लागल्याने एसटी बाजूच्या नाल्यात गेली. या अपघातात महिला कंडक्टर किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना लगेचच ग्रामस्थांनी धावली येथील परळी अंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रात दाखल केले. मात्र सर्व प्रवाशी अगोदरच खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला.