अभिजित बिचुकलेला पुन्हा खंडणीच्या गुन्ह्यात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 05:45 IST2019-06-23T05:43:03+5:302019-06-23T05:45:56+5:30

धनादेश न वटल्याने बिग बॉसच्या घरातून अटक केलेल्या अभिजित बिचुकले याला जामीन मिळताच तत्काळ सहा वर्षांपूर्वी दाखल असलेल्या दुसऱ्या खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली.

Abhijit bitchukka again arrested in connection with the ransom | अभिजित बिचुकलेला पुन्हा खंडणीच्या गुन्ह्यात अटक

अभिजित बिचुकलेला पुन्हा खंडणीच्या गुन्ह्यात अटक

सातारा -  धनादेश न वटल्याने बिग बॉसच्या घरातून अटक केलेल्या अभिजित बिचुकले याला जामीन मिळताच तत्काळ सहा वर्षांपूर्वी दाखल असलेल्या दुसऱ्या खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली. सध्या त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली असून, त्याच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
बिचुकलेवर सातारा न्यायालयात भा. दं. वि. १३८ अन्वये गुन्हा दाखल होता. २८ हजारांचा धनादेश वटला नसल्यामुळे त्याच्या विरोधात न्यायालयाने वॉरंट जारी केले होते. सातारा पोलिसांनी बिचुकलेला शुक्रवारी मुंबईतून अटक करीत साताºयात आणले. त्याची जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याने छातीत दुखत असल्याचे सांगितले. शनिवारी दुपारी अडीच वाजता त्याला पोलीस बंदोबस्तात न्यायालयात नेण्यात आले.
प्रथम वर्ग न्यायदंडधिकारी आर. व्ही. पाटील यांनी बिचुकलेची १५ हजारांच्या जामिनावर मुक्तता करत असल्याचे जाहीर केले. काही क्षणातच पोलिसांनी न्यायालयासमोर दुसरा अर्ज सादर केला. २०१३ मध्ये अभिजित बिचुकलेवर शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असून, या गुन्ह्यामध्ये आम्हाला त्याला अटक करायची आहे, असे पोलिसांनी न्यायालयापुढे सांगितले. न्यायाधीशांनी बाजू ऐकून घेऊन पोलिसांचा अर्ज मंजूर केला. त्यानंतर पोलिसांनी अभिजित बिचुकलेला तत्काळ अटक केली. सध्या त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, सोमवार, दि. २४ रोजी त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

Web Title: Abhijit bitchukka again arrested in connection with the ransom