अपहरण करून विद्यार्थ्याला बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 13:54 IST2019-08-16T13:52:39+5:302019-08-16T13:54:34+5:30
पूर्वीच्या वादातून अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना कोडोली येथे घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

अपहरण करून विद्यार्थ्याला बेदम मारहाण
सातारा : पूर्वीच्या वादातून अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना कोडोली येथे घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
संदीप मोरे, शुभम मोरे (रा. पालवी चौक, गोडोली, सातारा) यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील संशयितांनी दि. १४ रोजी सायंकाळी राज मारूती चौगुले (वय १७, रा. शाहूनगर सातारा) याला कामाठीपुरात मारहाण केली.
त्यानंतर त्याचे तेथून अपहरण करून त्याला गोडोली येथील पालवी चौकात नेण्यात आले. या ठिकाणी संदीप आणि शुभम मोरे यांनी अन्य तिघांच्या साथीने राज चौगुले याला बेदम मारहाण केली. या प्रकारानंतर राज याने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांच्या विरोधात तक्रार दाखल केली.