Crime News Satara: नोकरीच्या आमिषाने म्हसवडच्या युवकाची दीड लाखाची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 17:58 IST2022-12-27T17:57:32+5:302022-12-27T17:58:26+5:30
बँकेत मानव संसाधन अधिकारी या पदावरती निवड झाली आहे, असे सांगून त्याचा विश्वास संपादन केला.

Crime News Satara: नोकरीच्या आमिषाने म्हसवडच्या युवकाची दीड लाखाची फसवणूक
सचिन मंगरुळे
म्हसवड : नोकरीच्या आमिषाने म्हसवडमधील एका युवकाची दीड लाखाची फसवणूक करण्यात आली. आकाश नारायण मेंढापुरे असे या फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत मेंढापुरे यांनी म्हसवड पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, १ डिसेंबर ते २३ डिसेंबर २०२२ रोजी दरम्यान अंजली शर्मा व एच. आर. राघवन नावाच्या व्यक्तींनी आकाश मेंढापुरे यांच्या मोबाइलवर फोन केला. ‘तुमची कोटक महिंद्रा’ या बँकेत मानव संसाधन अधिकारी या पदावरती निवड झाली आहे, असे सांगून त्याचा विश्वास संपादन केला.
तसेच त्याच्याकडून १ लाख ४९ हजार रुपये घेतले. बनावट युजर आयडी व ईमेल आयडी देऊन फसवणूक केली. यासंदर्भात म्हसवड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ तपास करत आहेत.
फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन
नागरिकांनी अशा घटनांपासून दूर राहावे. बँक खात्याची डिटेल्स, नोकरीची आमिषे, लॉटरी लागली अशा प्रकारच्या संदेशापासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले.