शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: दुचाकी घसरुन फरफटत गेले, अज्ञात वाहनाखाली येवून चिपळूणच्या अभियंत्या तरुणीचा जागीच मृत्यू; हेल्मेटमुळे पती वाचला

By दत्ता यादव | Updated: March 14, 2023 13:42 IST

दोन दिवसांपूर्वी दोघेही सुटीसाठी चिपळूणला गेले होते. सुटी संपवून दुचाकीवरुन पुण्याला निघाले असता घडली दुर्घटना

सातारा : चिपळूणहून पुण्याला निघालेल्या अभियंत्या दाम्पत्याची दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरुणीचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाला. तेजस्वी गौरव पेवेकर (वय २१, रा. कळवंडे चिपळूण, जि. रत्नागिरी) असे अपघातात ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. हा अपघात काल, सोमवारी रात्री उशिरा बोरगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत झाला.याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तेजस्वी पेवेकर आणि गाैरव पेवेकर हे दोघे अभियंते असून, ते पुण्यातील एका कंपनीत नोकरी करतात. दोन दिवसांपूर्वी दोघेही सुटीसाठी चिपळूणला गेले होते. सुटी संपवून सोमवारी दुपारी ते दुचाकीवरून पुण्याला निघाले. बोरगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत रात्री पावणेआठ वाजता पोहोचले. त्यावेळी महामार्गावरून जाताना अचानक दुचाकी घसरली. साधारण वीस फूट फरफटत पुढे गेली तर पाठीमागे बसलेली तेजस्वी ही महामार्गावर खाली पडली. दरम्यान, पाठीमागून आलेले अज्ञात वाहन तिच्या डोक्यावरून गेले. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. पतीने हेल्मेट घातले असल्यामुळे फारसे ते जखमी झाले नाहीत. या अपघाताची माहिती बोरगाव पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह महामार्गावरून बाजूला घेण्यात आला. तर जखमी पतीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.‘स्पीड लेन’ला अपघातज्या स्पीड लेनवरून वाहने धावतात. त्याच लेनवर हा अपघात झाला. पाठीमागून भरधाव आलेले वाहन तेजस्वीच्या डोके आणि अंगावरून गेले. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. स्पीड लेनला जर हा अपघात झाला नसता तर तेजस्वीचा जीव वाचला असता, असे पोलिस सांगतायत. कोणत्या वाहनाखाली तेजस्वी सापडली, हे शोधण्यासाठी पोलिसांनी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे.   

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRatnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणAccidentअपघातhighwayमहामार्गDeathमृत्यू