Satara: रसायनाने भरलेल्या बॅरलच्या स्फोटात कामगार ठार; एक जण गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 12:07 IST2025-01-11T12:07:04+5:302025-01-11T12:07:45+5:30
कऱ्हाड (जि. सातारा) : रसायनाने भरलेला बॅरलचा स्फोट होऊन एक कामगार ठार तर एक गंभीर जखमी झाला. तासवडे (ता. ...

Satara: रसायनाने भरलेल्या बॅरलच्या स्फोटात कामगार ठार; एक जण गंभीर
कऱ्हाड (जि. सातारा) : रसायनाने भरलेला बॅरलचा स्फोट होऊन एक कामगार ठार तर एक गंभीर जखमी झाला. तासवडे (ता. कऱ्हाड) येथील औद्योगिक वसाहतीत शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. बॅरलच्या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, या आवाजाने परिसर हादरून गेला. भिकेश कुमार रंजन (वय २७, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. तासवडे औद्योगिक वसाहत) असे ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे.
तासवडे औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत शुक्रवारी दुपारी वेल्डिंगचे काम सुरू होते. त्यावेळी तेथील कामगार रसायनाने भरलेल्या बॅरलचे झाकण काढण्यासाठी गेले. झाकण काढत असताना अचानक बॅरलचा स्फोट झाला. या स्फोटात भिकेश कुमार रंजन हा ठार झाला, तर अन्य एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.