शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: ऊसतोड मजुराचे पाय बांधून दगडाने ठेचून खून, भोसे येथील घटना; खुनानंतर आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 14:22 IST

बीड जिल्ह्यातील नेतेमंडळींचा कारखान्यावर ठिय्या

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील भोसे येथे ऊसतोड मजुराचे पाय बांधून दगडाने ठेचून खून करून मृतदेह उसाच्या शेतात टाकण्यात आला. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी दुपारी उघडकीस आला. याप्रकरणी जरंडेश्वर शुगर मिलमधील स्लीप बाॅय म्हणून काम करणाऱ्या युवकावर कोरेगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. हा खून कोणत्या कारणातून झाला, हे मात्र अद्याप समोर आले नाही.मच्छिंद्र अंबादास भोसले (वय ४२, रा. उखळवाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड) असे खून झालेल्या ऊसतोड मजुराचे तर अजय राजेंद्र माने (रा. भोसे, ता. कोरेगाव, सातारा) असे खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, मच्छिंद्र भोसले हे गेल्या तीन ते चार वर्षांपासून ऊस हंगामासाठी जरंडेश्वर शुगर मिलसाठी काम करत होते.यंदाही ते पत्नी व कुटुंबासह चिमणगाव (ता. कोरेगाव) परिसरात वास्तव्यास आले होते. १५ जानेवारी रोजी रात्री मच्छिंद्र भोसले यांना हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन जात असल्याचे सांगून स्लीप बॉय अजय माने याने त्यांना आपल्या शेतात नेले. तेथे पाय बांधून त्यांचा दगडाने डोके ठेचून निर्घृण खून केला. त्यानंतर मृतदेह उसाच्या शेतात टाकून दिला.दरम्यान, मच्छिंद्र भोसले घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने १७ जानेवारी रोजी कोरेगाव पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर मंगळवारी सकाळी आरोपीचे वडील राजेंद्र माने शेतात गेले असता तेथे छिन्नविछिन्न अवस्थेत मच्छिंद्र भोसले यांचा मृतदेह आढळून आला. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.भोसले यांच्या पत्नीकडे पोलिसांनी चाैकशी केल्यानंतर अजय माने याच्यासोबत पती गेले होते, असे सांगितले. पोलिसांनी तातडीने माने याच्याकडे रुग्णालयात जाऊन चाैकशी करून या प्रकरणाचा उलगडा केला. मात्र, आरोपी सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याने खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले हे पुढील तपास करत आहेत.

जरंडेश्वर कारखान्यासमोर पोलिस बंदोबस्त...या घटनेची माहिती कारखाना परिसरात तसेच बीड जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे मृताच्या नातेवाइकांसह ग्रामस्थ कोरेगावकडे रवाना झाले आहेत. कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, यासाठी जरंडेश्वर शुगर मिल परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

खुनानंतर आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्नखून केल्यानंतर आरोपी अजय माने याने भीतीपोटी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तातडीने कोरेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही काळ तो अतिदक्षता विभागात उपचार घेत होता. त्यावेळी त्याच्या कुटुंबीयांना खुनाबाबत कोणतीही माहिती नव्हती.बीड जिल्ह्यातील नेतेमंडळींचा कारखान्यावर ठिय्याऊस तोडणी कामगाराचा खून झाल्याची माहिती मिळाल्यानंतर बीड जिल्ह्यातून विविध पक्षांचे नेते आणि ऊस तोडणी कामगारांचे नेते कोरेगाव पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी कारखाना कार्यस्थळावर जाऊन गव्हाणनजीक ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले यांनी गुन्ह्याबाबत माहिती देऊन शांतता राखण्याचे आवाहन केले. सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जातील, या खुनात जे-जे सहभागी असतील त्यांना गुन्ह्यात समाविष्ट केले जाईल,’ असा शब्द हुले यांनी दिल्यानंतर आंदोलकांनी मृतदेह बीड जिल्ह्यात नेऊन अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Sugarcane worker murdered, body crushed with stones, accused attempts suicide.

Web Summary : In Satara, a sugarcane worker was brutally murdered; his body crushed with stones. The accused, a mill worker, attempted suicide after. Police are investigating the motive.