शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
2
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
3
वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
4
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
5
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
6
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
7
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
8
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
9
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
10
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
11
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
12
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
13
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
14
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
15
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
16
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
17
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
18
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
19
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!

Satara: बोरगावजवळ सहलीच्या ‘बर्निंग बस’चा थरार; चालक, शिक्षकांच्या प्रसंगावधानाने मुले सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 1:43 PM

बसने रात्रीच्या एकच्या सुमारास अचानक पेट घेतला

सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव (ता. सातारा) हद्दीत पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या शालेय सहलीच्या बसने रात्रीच्या एकच्या सुमारास अचानक पेट घेतला. ही घटना बुधवारी रात्री एकच्या दरम्यान घडली. यावेळी बसचालक व शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यामुळे सुदैवाने पुढील अनर्थ टळला.याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर आगाराची बस (क्रमांक एमएच- ११, टी- ९२८६) शालेय सहल घेऊन गेली होती. बसमध्ये विद्यामंदिर गोगवे, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर या प्राथमिक शाळेतील तिसरी ते सहावीमधील ५० विद्यार्थी होते.शैक्षणिक सहल परतीच्या प्रवासाला असताना बोरगाव गावच्या हद्दीत रात्री एकच्या सुमारास बस आली असता तांत्रिक बिघाडाने बसने अचानक पेट घेतल्याचे चालकाच्या लक्षात आल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखून शिक्षकांच्या मदतीने मुलांना सुखरूप बाहेर काढले; मात्र मुलांचे साहित्य हे एसटीसहित जळून खाक झाले. सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या अपघाताची माहिती मिळताच तत्काळ बोरगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांनी लगेच सातारा नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबला पाचारण करून आग नियंत्रणात आणण्यात यश मिळविले; परंतु तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. यामध्ये विद्यार्थ्यांचे साहित्यही जळाले. काहीकाळ वाहतूक सेवारस्ता मार्गे पोलिसांनी वळविली होती. बसमधील सहलीच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या एसटी बसने पाठविण्यात आले. या घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआगStudentविद्यार्थी