सातारा: काहीतरी टोचल्याचा झाला भास, पण...; मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 18:58 IST2022-07-29T18:57:38+5:302022-07-29T18:58:52+5:30
पायाच्या जखमेतून रक्त येऊ लागले व तिला चक्कर आली. अन्

सातारा: काहीतरी टोचल्याचा झाला भास, पण...; मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
कोयनानगर : पाटण तालुक्यातील येराड येथील मुलीचा सर्पदंश झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. निकिता पांडुरंग साळुंखे (वय १२) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि.२१) घडली.
याबाबत स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निकिता गुरुवारी सायंकाळी घराच्या पाठीमागच्या बाजूला गेली असता, तिला सापाने दंश केला. यावेळी अंधार असल्याने तिला काहीतरी टोचल्याचा भास झाला. त्यानंतर निकिता घरात आली असता, पायाच्या जखमेतून रक्त येऊ लागले व तिला चक्कर आली.
नातेवाईकांनी तिला ग्रामीण रुग्णालय, पाटण येथे उपचारासाठी आणले. त्याठिकाणी उपचारानंतरही अत्यवस्थ वाटू लागल्याने तिला पुढील उपचारासाठी कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.