मूर्ख का म्हणतो विचारल्याने पायाचे मोडले हाड 

By नितीन काळेल | Updated: June 18, 2023 12:10 IST2023-06-18T12:09:18+5:302023-06-18T12:10:33+5:30

याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात कारी येथील एकाच्या विरोधात दुखापतीचा गुन्हा नाेंद झाला आहे.

a fool says why he broke his leg by asking in satara | मूर्ख का म्हणतो विचारल्याने पायाचे मोडले हाड 

मूर्ख का म्हणतो विचारल्याने पायाचे मोडले हाड 

लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा:  मूर्ख का म्हणतो, शिवीगाळ, दमदाटी का करतो असे विचारल्याने एकाला लाथाबुक्यांनी मारहाण करुन पायाचे हाड मोडण्यात आले. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात कारी येथील एकाच्या विरोधात दुखापतीचा गुन्हा नाेंद झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरण पूजा नवनाथ मोहिते (रा. कारी, ता. सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. या तक्रारीनंतर अरुण गजानन मोरे (रा. कारी) याच्याविराेधात गुन्हा नोंद झाला आहे. दि. २९ मे रोजी सायंकाळच्या सुमारास कारी गावच्या हद्दीतील बसथांब्याजवळ मारहाणीचा हा प्रकार घडला होता.

तक्रारदारांचे दीर मच्छिंद्र दादासो मोहिते आणि अरुण मोरे हे बसथांब्याच्या सिमेंटच्या कट्यावर बसले होते. त्यावेळी अरुण मोरे याने मच्छिंद्रला मी माझा पगार घेतला आहे. तु घेतला का ?, तू मुर्ख आहे, असे म्हटले. तसेच शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली. यामुळे मच्छिंद्र मोहितेने तु मला शिवीगाळ, दमदाटी का करतो अशी विचारणा केली. यावरुन अरुण मोरे याने मच्छिंद्र मोहितेला जखमी होण्याच्या उद्देशाने डांबरी रस्त्यावर ढकलून दिले. तसेच लाथा घालू लागला. यामध्ये मच्छिंद्रच्या डाव्या पायाचे हाड मोडले आहे. सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. हवालदार वायदंडे हे तपास करीत आहेत.

Web Title: a fool says why he broke his leg by asking in satara