शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Satara ZP Election 2026: भाजपने खाते खोलले; माणमध्ये एक उमेदवार बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 19:29 IST

जिल्ह्यातील चित्र स्पष्ट : पाटणचा ‘सामना’ होणार निर्णायक...

सातारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय चित्र स्पष्ट झाले असून, महायुती अंतर्गतच ही लढाई होणार आहे. त्यामुळे आता निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. तर, भाजपने माण तालुक्यात बिनविरोधने खाते खाेलले आहे. आंधळी गणातून अर्जून काळे बिनविरोध निवडून आले आहेत. तर, जिल्हा परिषदेच्या ६५ गट आणि पंचायत समितीच्या १३० गणांसाठीची ही निवडणूक आहे.सातारा जिल्हा परिषद आणि ११ तालुक्यातील पंचायत समितीची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनी होत आहे. या संस्थांवर मागील पावणे चार वर्षांपासून प्रशासक राजवट आहे. पण, आता जिल्हा परिषदेच्या ६५ गट आणि पंचायत समितींच्या १३० गणांसाठी निवडणूक जाहीर झाली. यासाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत २७ जानेवारी होती. अर्ज माघार घेण्यादरम्यान अनेक तालुक्यात राजकीय घडामोडी घडल्या. त्यामुळे अनेकांनी अर्ज माघार घेतले. यामध्ये माण तालुक्यातील आंधळी गणात भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.जिल्ह्यातील निवडणूक ही प्रामुख्याने भाजपविरोधातच होणार आहे. अनेक ठिकाणी भाजपच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली आहे. तसेच शिंदेसेनेनेही भाजपविरोधात दंड थोपटलेत. उद्धवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, काॅंग्रेसही काही ठिकाणी लढत देत आहे. तरीही जिल्ह्यातील ही निवडणूक महायुती अंतर्गतच रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कराड तालुक्यात जिल्हा परिषदेचे सर्वाधिक १२ गट असून, गणांची संख्या २४ आहे. कराडला भाजपच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात. काही ठिकाणी शिंदेसेनेने तसेच राष्ट्रीय काॅंग्रेसनेही उमेदवार उभे केले आहेत. सातारा तालुक्यात भाजपविरोधात इतर पक्ष रिंगणात आहेत. फलटणला जवळपास सर्वच ठिकाणी तिरंगी लढत अपेक्षित आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस एकत्र आली असली तरी विरोधात शिंदेसेना दंड थोपटून तयार आहे तसेच वंचित, रासप, बसपाचेही उमेदवार लढत आहेत.

पाटणचा ‘सामना’ होणार निर्णायक...१. पाटण तालुक्यात शिंदेसेना आणि भाजपमध्येच खरा सामना आहे. कोरेगाव तालुक्यात दोन गटात दुरंगी तर चार ठिकाणी चाैरंगी लढत होणार आहे. भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी, काॅंग्रेस, उद्धवसेना निवडणुकीत आहे. खटाव तालुक्यात भाजप, राष्ट्रवादी, शिंदेसेना, काॅंग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना रिंगणात आहे.२. खंडाळा तालुक्यात भाजपविरोधात राष्ट्रवादी काॅंग्रेस अशी प्रमुख लढत होणार आहे. येथे दुरंगीच सामना होईल. वाई तालुक्यातही भाजपच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्या आहेत. यामुळे वाईत निकराची लढाई अपेक्षित आहे.

महाबळेश्वर, जावळी, माणमध्ये अटीतटीची लढत...महाबळेश्वर तालुक्यात महायुती अंतर्गतच खरी लढत आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदेसेनाही मैदानात उतरली आहे. जावळी तालुक्यात भाजपच्या विरोधात शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र आलेत. काही ठिकाणी अपक्षही रिंगणात आहेत. त्यामुळे जावळीतील निवडणूक ही अटीतटीची होण्याचा अंदाज आहे. माण तालुक्यात भाजपविरोधात राष्ट्रवादी आणि रासप एकत्र आलेत. माणमधील काही गट आणि गणांत कांटे की टक्कर आहे. यामध्ये मार्डी, कुकुडवाड गटाचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara ZP Election 2026: BJP Opens Account, One Unopposed in Man

Web Summary : Satara ZP election heats up. BJP gains unopposed seat in Man. Multi-cornered fights expected across 65 ZP and 130 Panchayat Samiti seats. Key battles in Patan, Wai, Mahabaleshwar.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Satara areaसातारा परिसरpanchayat samitiपंचायत समितीBJPभाजपा