शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मधमाशांच्या हल्यानंतर जीव वाचविताना डोंगरावरील कड्यावरून घसरला पाय अन्१३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 18:38 IST

Death Case : सोमेश्वर विलास कदम (वय १३, रा. तारळे, ता. पाटण) असे कड्यावरून पडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

सातारा: मधमाशांनी हल्ला केल्यानंतर जीव वाचविताना पळतअसताना तीनशे फूट खोल कड्यावरून  कोसळून बारा वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी अकराच्या सुमारास शेरेवाडी, ता. सातारा येथील शिरोबाच्या डोंगरावर घडली.सोमेश्वर विलास कदम (वय १३, रा. तारळे, ता. पाटण) असे कड्यावरून पडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शेरेवाडी, ता. सातारा येथे असलेल्या आपल्या मामाकडे सोमेश्वर काही दिवसांपूर्वी आला होता. रविवारी सकाळी मामासोबत तोशिरोबाच्या डोंगरावर गेला होता. त्यावेळी मधमाशांचं पोळ अचानक उठले. या माशांनी मामा व सोमेश्वरवर अचानक हल्ला केला. जीव वाचविण्याच्या आकांताने मामा आणि भाचा इतरत्र पळू लागले. यावेळी डोंगराच्या कड्यावरून सोमेश्वरचा पाय घसरल्याने तो तब्बल तीनशे फूट कड्यावरून खाली कोसळला. हा प्रकार गावातील काही लोकांना समजल्यानंतर त्यांनी डोंगराकडे धाव घेतली. मात्र, कडा खोल असल्यामुळे त्यांना खाली उतरता आले नाही. त्यानंतर  शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सचे चंद्रसेन पवार, देवेंद्र गुरव, आदित्य पवार, सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह शेरेवाडीचे ग्रामस`थ घटनास`थळी दाखल झाले. यासर्वांनी दरीत उतरून सोमेश्वरचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, मधमाशांच्या हल्लामध्ये सोमेश्वरचा मामाहीगंभीर जखमी झाला असून, त्यालाही सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूSatara areaसातारा परिसर