महाबळेश्वरमध्ये चार दिवसांत ८६१ मिलीमीटर पाऊस, जनजीवन विस्कळीत; येत्या ४८ तासांत रेट अलर्ट

By दीपक शिंदे | Published: July 22, 2023 12:34 PM2023-07-22T12:34:40+5:302023-07-22T12:34:57+5:30

चार ही बाजूने घाट असल्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे

861 mm rain in four days in Mahabaleshwar, Rate alert in next 48 hours | महाबळेश्वरमध्ये चार दिवसांत ८६१ मिलीमीटर पाऊस, जनजीवन विस्कळीत; येत्या ४८ तासांत रेट अलर्ट

महाबळेश्वरमध्ये चार दिवसांत ८६१ मिलीमीटर पाऊस, जनजीवन विस्कळीत; येत्या ४८ तासांत रेट अलर्ट

googlenewsNext

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यामध्ये गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवार, दि. १८ रोजी १७६.४ मिलीमीटर व बुधवार, दि. १९ रोजी २७५.०६ मिलीमीटर तर गुरुवार, दि. २० रोजी ३१४.० मिलीमीटर व शुक्रवारी (दि. २१) सकाळी आठपर्यंत ९६ मिलीमीटर केवळ चार दिवसांत ८६१.४६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज अखेरपर्यंत २४२०.५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. येत्या ४८ तासांत हवामान विभागाकडून रेट अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

महाबळेश्वरमध्ये चारही बाजूने मोठमोठे डोंगर असल्यामुळे शहरात दाखल होण्यासाठी वाईकडून येताना पसरणी घाट, मेढा मार्गे येताना केळघर घाट, अंबेनळी व तापोळा घाट असे चार ही बाजूने घाट असल्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामध्ये चार दिवसांच्या मुसळधार पावसात अंबेनळी घाट हा रायगड हद्दीमध्ये दरड रस्त्यावर आल्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. महाबळेश्वर-पाचगणी मुख्य रस्त्यावर वेण्णा नदीचे पाणी आल्यामुळे वाहतूक काहीवेळ धीम्या गतीने सुरू होती तर महाबळेश्वर-तापोळा घाटात दोन ठिकाणी दरड पडलेली होती. महाबळेश्वर तालुक्यात बांधकाम विभागाचे काम जोरात असल्यामुळे दरडी व दगड माती काही वेळातच काढून मार्ग सुरळीत करण्यात येत आहे.

शुक्रवार, शनिवार पर्यटक महाबळेश्वरमध्ये पाऊस पाहण्यासाठी दाखल होत असतात किंवा ग्रामीण भागातील स्थानिक नागरिक भाजीपाल्यासाठी महाबळेश्वरमध्ये दाखल होत असतात. एखादी अनुसूचित घटना घडू नये, किंवा एखाद्या ठिकाणी दरड पडणे किंवा पाणी येणे ही घटना लगेच प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी महाबळेश्वरच्या ग्रामीण भागात दूरध्वनीचे नेटवर्क ग्रामीण भागापर्यंत पोहोचले पाहिजे.

ग्रामीण भागात विद्युत पुरवठा दोन-दोन दिवस खंडित होतो, त्यासाठी कर्मचारी वाढविले पाहिजेत. आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिका उपलब्ध हव्या, बांधकाम विभागातून ठिकठिकाणी जेसीबी घाटाघाटात उभे करून ठेवणे गरजेचे आहे तर महाबळेश्वर शहरातील पेट्रोल पंप एकच असल्यामुळे त्याची बंद करण्याची वेळ वाढविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: 861 mm rain in four days in Mahabaleshwar, Rate alert in next 48 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.